गुलाबभाऊ, छोट्या-मोठ्या गोष्टींचे चिल्लरचाळे करू नका, सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या..

By : Polticalface Team ,Tue Nov 01 2022 18:42:25 GMT+0530 (India Standard Time)

गुलाबभाऊ, छोट्या-मोठ्या गोष्टींचे चिल्लरचाळे करू नका, सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या.. जळगाव : तुम्ही फलक पळवताहेत, शिवसैनिक पळविणार आहात का? शिवसेनेचा जो मूळ विचार तुम्ही पळवू शकणार आहात का? त्यामुळे अशा छोट्या-मोठ्या गोष्टींचे गुलाबभाऊंनी चिल्लरचाळे करू नये, नाहीतर लोकच त्यांना विचारतील, कुठल्यातरी गाण्यासारखं… कसं काय पाटील बरं आहे का… गुवाहाटीला काहीतरी खोक्याचा कारभार केला म्हणे. असं त्यांनी करू नये, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. महाप्रबोधन यात्रेतील दुसर्‍या टप्प्यासाठी अंधारे मंगळवारी जळगाव जिल्ह्यात आल्या. यावेळी त्या बोलत होत्या.

गुलाबराव पाटलांनी केलेल्या टीकेला अंधारेंनी आपल्या स्टाईलने उत्तर दिले. त्या म्हणाल्या, गुलाबभाऊ म्हणत असतील ही आमची छोटी बहीण आहे, बाळ आहे. तर ते सर्व मला बाळ म्हणून खोड्या करण्याचे अधिकार देताहेत. याकडे मी सकारात्मकतेने आणि खिलाडू वृत्तीने घेते

शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडताना अंधारे म्हणाल्या, आमच्याकडे आमदारांमुळे शिवसैनिक नसतात, तर शिवसैनिकांमुळे आमदार असतात. त्यामुळे जिल्ह्यातील पाच आमदार गेले असले आणि त्यांच्यासोबत काही टेंडर, गुत्तेदारीच्या राजकारणातले काही लोक गेले असले, तरी याचा अर्थ जळगावमध्ये शिवसेनेची क्षती झाली असे अजिबात वाटत नाही. जे पाच लोक गेलेले आहेत, सत्ता असतानाही त्यांना वाय प्लस सुरक्षा घेऊन फिरावे लागते आहे, यातच सर्वकाही उत्तर येते.

विरोधकांच्या सुरक्षेवर अंधारे म्हणाल्या की, बंडखोरांनाच सुरक्षेची गरज आहे. कारण, विरोधकांच्या पाठीशी लोकबळ आहे. लोक त्यांना सांभाळून घेत आहेत. लोकांना माहिती आहे, सत्ताधार्‍यांना सुरक्षेची गरज आहे. सत्ताधार्‍यांनी सत्ता ही कुटीलपणे, कुटनीतीने आणि कपटकारस्थानाने मिळविलेली आहे सध्या जनता अत्यंत संतप्त असून त्यापासून संरक्षण करण्यासाठी, तसेच त्यांना काही करू नये, म्हणून घाबरलेल्या सरकारने ही सुरक्षा वाढवून घेतली आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न