By : Polticalface Team ,10-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे):
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक ऊसाच्या रसाची चव घेताना दिसून येत आहे.उन्हाळ्यात लोक सावलीत जाणे पसंद करत असतात. उन्हात फिरल्याने उष्माघात होवून मृत्यू होण्याची शक्यता असते, म्हणून नागरिकांनी सतर्क राहावे आणि थंड पाणी पिवून काळजी घ्यावी.
उन्हाळा आला की आपल्या रोजच्या जीवनशैली मध्ये एक नवीन पेय ऍड होते, ते म्हणजे उसाचा रस.उसाचा रस हा प्रत्येकाला खूप आवडतो. उन्हाळ्यामध्ये उसाचा थंडगार रस पिण्याची मजा काही औरच असते. उन्हाळ्याच्या दिवसात आपण अनेकवेळा पाण्याऐवजी उसाच्या रसाला प्राधान्य देतो. उसाचा रस केवळ उन्हापासून आपला बचाव करत नाही;तर अनेक आजारांना दूर ठेवण्यासही मदत करतो.उसाच्या सेवनामुळे शरिरातील पाण्याची कमतरता दूर होते व भरपूर ऊर्जा ही मिळते.
उसाचा रस आरोग्यास चांगलाही मानला जातो. कारण उसाच्या रसात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह,मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी पिशक तत्वे असतात.त्यामुळे हाडे मजबूत होतात व दातांच्या समस्याही कमी होतात. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे हा रस डायबिटीजच्या रुग्णांसाठी देखील उत्तम असतो.हे दृश्य आहे गंगापूर तालुक्यातील लासूर नाका जवळील संतोष शिवाजी पाव्हणे यांच्या रसवंती गृहातील!