मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा, आमदार दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

By : Polticalface Team ,07-10-2023

मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा, आमदार दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

इंदापुर (प्रतिनिधी जन आधार न्युज ): भरणेवाडी येथे उद्या मोफत ग्रामीण आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून इंदापूर तालुक्यातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले आहे. रविवार दि.०८ ऑक्टोबर रोजी कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भरणेवाडी येथील ग्रामपंचायत प्रांगणामध्ये हे शिबिर संपन्न होणार असून भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने या शिबिराची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हे शिबिर आयोजित करण्यामागचा उद्देश विषद करताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, कोरोना महामारी पासून नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे निदर्शनास येत आहे. अलीकडच्या काळात आजारपणाला वयाचे कुठलेही बंधन राहिले नसून तालुक्यामध्ये फिरत असताना असंख्य नागरिक वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासलेले दिसत आहेत यामध्ये विशेषतः तरुण मुले आणि महिलांचे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये पुणे - मुंबई सारख्या मोठ-मोठ्या दवाखान्यांमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांना महागडे उपचार करणे आवाक्या बाहेरचे बनले आहे.त्यामुळे आपण हे शिबिर आयोजित केले असून यामध्ये ससून रुग्णालयातील नामांकित तज्ञ डॉक्टरांची टीम आपल्याकडे येणार आहे यामध्ये नेत्ररोग,डोळे तपासणी व चष्मेवाटप,स्त्रीरोग,मेंदू रोग,कर्करोग,हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार,कान,नाक व घसा तपासणी,ग्रंथीचे विकार,त्वचा व गुप्तरोग, जनरल सर्जरी,लठ्ठपणा, दंतरोग,श्वसनविकार व क्षयरोग,मानसिक आरोग्य, जनरल मेडिसिन,बाल आरोग्य,प्लास्टिक सर्जरी,मूत्ररोग अशा वेगवेगळ्या आजारांवर मोफत तपासणी चाचण्या, औषधोपचार व शस्त्रक्रिया पार पडणार असल्याचे आमदार भरणे म्हणाले.
तसेच या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आभा ओळखपत्र व आयुष्यमान भारत ओळखपत्र काढण्यासाठी नोंदणी कॅम्प सुद्धा दिवसभर चालणार आहे त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरही पार पडणार आहे.तरी या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार भरणे यांनी केले आहे.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन