मला संधी मिळते फक्त संविधानामुळेच. - संतोष भोसले

By : Polticalface Team ,27-11-2023

मला संधी मिळते फक्त संविधानामुळेच.
                     - संतोष भोसले लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक, लोणी व्यंकनाथ येथे संविधान दिन साजरा करण्यात आला 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान आपल्याला अंगीकृत आणि बहाल करण्यात आले. परंतु 25 नोव्हेंबर 1949 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे भाषण झाले ते जगाला दिशा देणारे ठरले. अनुसूचित जाती आणि जमातीतील व्यक्तींना साधे तूप सुद्धा खाण्याची परवानगी नव्हती बाबासाहेबांनी ती केस हाती घेतली आणि आज समाजातील लोक तुपात आंघोळ करण्याची हिम्मत ठेवतात .माता भगिनींचे संरक्षणाविषयी कडक कायदे करून संरक्षण दिले सर्वांना समान संधी स्वातंत्र्य, बंधुता, एकता अबाधित ठेवण्याचे काम आपला सर्वश्रेष्ठ ग्रंथ भारताचे संविधान करत आहे आणि त्याच संविधानाला आज काही लोक उंदरासारखे कुरतडण्याचे काम करत आहेत. आपल्याला संविधानाने जे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत ते अबाधित ठेवण्यासाठी संविधान जिवंत ठेवावे लागेल आणि त्यासाठी जनजागृती पर विविध कार्यक्रम घेण्याची गरज आहे असे बोलताना सहारा सर्वांनी विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष भोसले म्हणाले. हा कार्यक्रम सहारा सर्वांगीण विकास संस्था , पारगाव सुद्रिक ग्रामपंचायत आणि इकोनेट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात छाया भोसले व गोरखे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरूवात झाली,भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले .महिलांनी व पुरुषांनी संविधानासोबत सेल्फी घेतल्या. यावेळी सरपंचपती दत्तात्रय (माऊली )हिरवे ,ग्रामपंचायत सदस्य मंगेश घोडके ,राहुल आल्हाट, उपसरपंच पदी राहुल दानवे ,हिराबाई गोरखे ,ग्रामविकास अधिकारी घोरपडे भाऊसाहेब ,बाळासाहेब आल्हाट ,महादेव गोरखे ,निखिल गाडेकर, कराळे भाऊसाहेब, नितीन जावळे, ज्ञानदेव मगर, विक्रम सिंह जाधव, पप्पू चव्हाण, कमलाकर आल्हाट, सतीश खामकर, संभाजी जगताप, निंबाळकर गंगाराम , उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालण मंगेश घोडके यांनी तर आभार महादेव गोरखे यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.