श्रीगोंदा शहराची अध्यात्मिक व ऐतिहासिक महती सांगनारे काव्य..!
कवी:- कृष्णा भगवान घोलप.
By : Polticalface Team ,20-01-2024
✍️कवी:- कृष्णा भगवान घोलप. ---------------------------------------
धन्य श्रीगोंदा माय धर्मभूमी l
बहूत संतांची हिच कर्मभूमी llधृll
संत शेख महंमद चरनरज आहे l
आणिक नीर वाहे सरस्वतीचे ll
राऊळबाबा गोदड महाराज l
आणिक समाधी प्रल्हाद महाराज ll
मन शुद्ध ठेवा केला उपदेश l
ऐसे संत जाले येथे रोहिदास ll
शिल्पकला साजीरी पाहता मन भरे l
ऐसे राजवाडे आणिक मंदिरे ll
सिद्धेश्वराजवळी वाजे मृदंग टाळ l
पावन जाहला मैनाबाईचा माळ ll
स्वयें पांडुरंगे वसविले शहर l
ऐसे संतभार वर्तताती ll
झेंडाचौक विजय कासया म्हणती l
परतले जिंकोणी रथी महारथी ll
विजयोत्सव जाहलासे जेथे l
झेंडाचौक तेथे साक्ष असे ll
अपशकुनी मानू नका दिल्ली वेस l
शौर्य गाजवले विरांनी पानिपतास ll
पीर आणि सद्गुरू एकचि भाव l
ऐसे चांभारगोंदे सलोख्याचे गाव ll
नारायण अश्व पुढे पालखीला मान l
पंढरीला जाती पायी हिंदूमुसलमान ll
सरस्वती माय दक्षिणेला वाहे l
भीमेला मिळोनी पेडगाव पाहे ll
दक्षिणकाशी महिमान आगळे l
श्रीपूराचे सोहळे काय सांगू ll
वर्णिता महिमान शब्द भांडार दुबळे l
मी तो बापुडा वेगळे कैसे वर्णू ll
अध्यात्म ईतिहास मेळ देखियला l
भाव उचंबळला कृष्णा म्हणे ll
कवि - कृष्णा भगवान घोलप
(मु.पो.पेडगाव, ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर) मो.नं. 9623767218
वाचक क्रमांक :