विशाल गड घटनेचा करमाळा मुस्लिम समाजाने केला तीव्र शब्दात निषेध- हाजी कलीम काझी

By : Polticalface Team ,19-07-2024

विशाल गड घटनेचा करमाळा मुस्लिम समाजाने केला तीव्र शब्दात निषेध- हाजी कलीम काझी

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 

अतिक्रमण मुक्त विशाळगड मोहिमेस हिंसक वळण लावुन अल्पसंख्याक समाजाला जाणीवपूर्वक लक्ष करत असुन. तेथील झालेल्या अतिक्रमणाला व अतिक्रमण काढण्यासाठी मुस्लीम समाजाचा पुर्ण पणे पाठिंबा असुन ते अतिक्रमण प्रशासनाने तात्काळ काढण्याची मागणी आहे व तेथे घडलेल्या गोष्टींचा मुस्लीम समाज निषेध व्यक्त करत असुन छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज , महात्मा फुले  , डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांच्या विचारांना हरताळ फासणारी घटना आहे . याचा मुस्लीम समाज निषेध करत आहे .


 सकल मुस्लीम समाज करमाळा चे मार्गदर्शक व शहर काझी हाजी कलीम काझी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सकल मुस्लीम समाज चे शहर अध्यक्ष जमीर भाई सय्यद , आझाद भाई शेख (उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट ), अशपाक भाई जमादार ( उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोलापूर जिल्हा अजित पवार गट ) सोहेल भाई पठाण ( करमाळा शहर अध्यक्ष अजित पवार गट ) यांनी निवेदन मा.नायब तहसीलदार करमाळा व मा. बनकर साहेब पोलीस उपनिरीक्षक करमाळा पोलीस ठाणे  यांना दिले आहे.


      छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1659 साली विशाळगड किल्ला जिंकला होता व जवळ जवळ 45 वर्षे तेथे महाराजांची सत्ता होती व त्या काळापासून रेहान मलिक दर्गा व मशीद होती त्या काळात महाराजांनी या वास्तूंचे संरक्षण केले आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही समाजाला आवाहन करतो की कोणत्याही अफवांवर वर विश्वास न ठेवता सामाजिक जाणीव ठेवून शांतता ठेवून आपले सामाजिक बांधिलकी जपत सौहार्दाचे वातावरण समाजात राहील असे प्रयत्न करावे .

अशा घटना घडु नये म्हणून मा. मुख्यमंत्री, मा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे पोलीस महासंचालक, जिल्हा अधिकारी,व पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घातले पाहिजे असे समस्त समाजा तर्फे विनंती करत आहोत. 

यावेळी  जिशान कबीर.अलीम खान.शाहिद बेग. बाबा कुरैशी. कदीर सय्यद. जावेद मदारी. आलीम शेख. आयुब मदारी. जमीर मदारी. जमील मदारी . रमज़ान सय्यद मुबारक मदारी.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

पाटस येथील तक्षशिला बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती. कोजागिरी पौर्णिमा निमीत्त सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन. तथागत गौतम बुद्ध मूर्तीची केली स्थापना.

महाराष्ट्र शासन संत सेवालाल महाराज लमाण तांडा योजनेच्या दौंड तालुका अशासकीय सदस्य पदी मिथुन राठोड यांची निवड..

मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त दशरथआण्णा कांबळे यांचा मराठा मार्गदर्शक सामाजिक गौरव पुरस्काराने सन्मान....

दौंड पोलीस प्रशासनाचे जाहीर आवाहन. आदर्श आचारसंहितेचे पालन करा. पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार.

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा .

अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकरी श्री आल्हाट यांच्या बांधावर

विजयादशमीनिमित्त सामाजिक बांधिलकी व गुणवत्तेचा सन्मान व्हावा - प्रा.गणेश करे-पाटील. रावगाव विद्यालयास यशकल्याणीकडून ६ स्मार्ट टि.व्ही.संच प्रदान..!

संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब झाल्याने मतदार आता बदल करणार : प्रवक्ते तळेकर

आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान

उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन

इंदापूर तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या तीन शाखांचे जल्लोषात उद्घाटन

राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ?तुतारी आणि पिपाणी मोठा गोंधळ उडणार ?

आईने कष्टाने घेऊन दिलेली गाडी चोरीला गेली “आईची शेवटची आठवण, प्लीज परत करा..” पुणेकर तरुणाची पाटी पाहून व्हाल भावुक

डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना

बारामतीच्या टीसी कॉलेज परिसरात बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक शाखेचा जोरदार दणका! 84 वाहनांवर कारवाई! पाऊण लाखांचा दंड

मोठी बातमी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल

आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार नाही भाजपाची उमेदवारी मलाच मिळेल, भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांचे पत्रकार परिषदेत सुतवाच्य

मुलनिवासी बहुजनांना राष्ट्रीय स्तरावर एकत्र यावे लागेल - कमलकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष

पिसोरेखांडच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती लीलावती येरकळ यांचा नागवडेंकडून सन्मान