१८ व्या शतकातील एक उत्तम प्रशासक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यामातेची नोंद आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी अहिल्यादेवीच्या विचारांचा आदर्श घ्यावा - कल्याणी वाघमोडे

By : Polticalface Team ,22-07-2024

१८ व्या शतकातील एक उत्तम प्रशासक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यामातेची नोंद आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी  अहिल्यादेवीच्या विचारांचा आदर्श घ्यावा - कल्याणी वाघमोडे    दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.बारामती ता २२ जुलै २०२४. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९९ वी सार्वजनिक जयंती उत्सव सोहळा वर्ष १० वे. श्री छत्रपती सह.सा. कारखाना-भवानीनगर बारामती इंदापूर रोड भवानीनगर. ग्राउंड येथे दि २१ जुलै रोजी जयंती उत्सव विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार सोहळा उत्स्फूर्तपणे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती साखर कारखाना भवानीनगर येथील विविध क्षेत्रातील महिलांसह मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष व 299 वी जयंती उत्सव चे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन दर वर्षी प्रमाणे केले होते. आयोजक : अहिल्याक्रांती महिला विकास प्रतिष्ठान सौ. कल्याणीताई वाघमोडे व महिला समिती सकल धनगर समाज/सर्व सहयोगी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योगदान केले. सर्व महापुरुषांचे स्मारक प्रतिमांना अभिवादन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार आयोजकांच्या हस्ते करण्यात आले या वेळी. प्रस्ताविक मनोगत व्यक्त करताना कल्याणी वाघमोडे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे स्वागत व आभार व्यक्त केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा म्हणून असे उत्सव करणे गरजेचे आहे. आज पर्यंत राजकीय पक्षांनी फक्त मतांसाठी अहिल्यादेवी च्या नावाचा व धनगर -ओबीसी समाजाचा वापर केला आहे अशी खंत व्यक्त केली. हा सामाजिक कार्याचा विचार अखंडपणे चालू राहील असा विश्वास व्यक्त करत अठराव्या शतकातील उत्तम प्रशासक असणाऱ्या व २८ वर्षे राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांनी घ्यावा, असे मत कल्याणी वाघमोडे यांनी बोलताना व्यक्त केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ वी सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने अहिल्या रत्न पुरस्काराने स्वर्गीय बी.के.कोकरे यांचे सुपुत्र विशाल कोकरे यांना गौरवण्यात आले. या वेळी मनोगत व्यक्त करतांना त्यांनी चळवळीचे महत्त्व व स्वर्गीय बी.के कोकरें याचा लढा या बाबत विचार व्यक्त केले. चळवळ नेहमी जागृत राहिली पाहिजे आणि ती चालवण्याचे काम वाघमोडे कुटुंब करत आहे हि अतिशय कौतुकास्पद बाब आहे. मेंढपाळ समाजाने देखील शिक्षण घेऊन समाज जन जागृतीचे कार्य केले पाहिजे. तसेच जयंतीच्या माध्यमातून सामाजिक चळवळ जागृत राहिली पाहिजे, कल्याणी वाघमोडे यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे -विशाल बी.के कोकरे यांनी बोलताना मत व्यक्त केले.समाजरत्न पुरस्कार म्हणून धनगर आरक्षण उपोषण कर्ते चंद्रकांत वाघमोडे, लेखिका व कवयित्री स्वाती तोंडे, निरगुडे ग्रा.सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या साधना केकाण, सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा मुलाणी, स्व.शंकरराव नारायण सोट पाटील संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट पाटील. दलित पॅंथर चे हर्षल वाघमारे, ज्येष्ठ समाजसेविका मंजुळाताई रुपनवर, लक्ष्मी करे, लोकशाही न्यूज व मानवाधिकार फाउंडेशनचे धनराज जगताप, तलाठी परीक्षा उत्तीर्ण झालेले सचिन वाघमोडे आणि उल्लेखनीय म्हणून आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेली कुस्तीपटू रोहिणी देवबा, महाराष्ट्र केसरी पै.अमृता पुजारी यांना गौरवण्यात आले. दहावी तील ९२ टक्के मार्क्स मिळवलेली शुभांगी खरात, संस्कृती रुपनवर (८४ %), कल्याणी बंडगर ( ९०%), बारावीतील वैभवी देवकाते ( ८५ %), सिद्धी पांढरे (८५%) आदी विद्यार्थ्यांना सत्कार करुन गौरविण्यात आले. तसेच या प्रसंगी माळशिरस आणि दौंड तालुक्यातील गझी ढोल नृत्य स्पर्धाकांनी उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले होते हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होती. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य राहुल भाऊ झारगड, दत्तात्रेय भाऊ पुणेकर, ढेकळवाडी चे माजी सरपंच नानासो घुले,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अण्णा देवकते, जय हिंद सेनेचे सनी पाटील, योद्धा प्रोडक्शन चे योगेश नालंदे,प्रहार संघटनेच्या तालुकाध्यक्ष सुकशाला ढाणे,शालन पांढरे, ज्योती मारकड, पूनम चोपडे,अविनाश भिसे,अजितभाऊ घुले ,भूषण टकले, सचिन गडदे, वामन भिसे सर , नाना सोलनकर, संकेत देवकाते , निखिल पाटील, धनसिंग पाटील आदी सह युवा मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. महिलांच्या मनोरंजन कार्यक्रमात विजेत्या स्वरांजली पांढरे यांनी पैठणी जिंकली. आभार व मनोगत डॉ.सुजित वाघमोडे यांनी मानले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बुरुंगले व विलास दोलतडे यांनी केले छायाचित्रण प्रशांत कुचेकर यांनी केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

केडगाव पाटबंधारे शाखेत सावळा गोंधळ. निवासी शाखा अधिकारी कर्मचारी मिळतील का ? वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ?

केडगाव स्टेशन (बोरीपार्थी) पाटबंधारे वसाहत सार्वजनिक श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीदत्त पालखी मिरवणूक. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न