देऊळगाव राजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सचिवाने ८ हजार रुपये लाच मागितल्या वरुन. दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

By : Polticalface Team ,22-07-2024

देऊळगाव राजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सचिवाने ८ हजार रुपये लाच मागितल्या वरुन.  दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता 22 जुलै 2024 दौंड तालुक्यातील मौजे देऊळगाव राजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी देऊळगाव राजे ता दौड जि पुणे येथील सचिव सुनिल मनोहर जाधव रा हिंगणीबेर्डी ता दौड जि पुणे याचे विरुद्ध दिनांक 18/07/2024 रोजी सुनिता रामचंद्र नागवे,वय 49 वर्षे, व्यवसाय अंगणवाडी सेविका,रा वडगाव दरेकर ता दौड जि पुणे यांच्या फिर्यादी वरून दौड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं 531/2024 भा.न्या.स कायदा कलम-118 (1), 352, 351(2) गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले. या बाबत अधिक माहिती अशी की दि 18/07/2024 रोजी फिर्यादी नेहमी प्रमाणे वडगाव दरेकर अंगणवाडी केंद्र येथून दुपारी 01.00 वा चे सु घरी आली.व मुलाचे कर्जाचे कागदपत्रे देण्यासाठी देऊळगाव राजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी देऊळगाव राजे ता दौड जि पुणे येथे दुपारी 02.00 वा चे सु गेली असता सोसायटी मधील सचिव सुनिल मनोहर जाधव यांना मुलाचे कर्जाचे कागदपत्रे देण्यासाठी भेटले तेव्हा फिर्यादीला ते म्हणाले की तुम्ही तलाठ्याचा दाखला आणा मग तुमचे कर्जाचे पैसे वाटप करेल असे सांगितले वरुन फिर्यादी लगेच दाखला आणते मला आजचे आज कर्जाचे पैसे दया असे म्हणालेवर सचिव सुनिल मनोहर जाधव हे फिर्यादीला म्हणाले की तुमचे कर्जाचे वाटप आज करतो मला 8,000/-रूपये दया त्यावर मी त्यांना म्हणाले की माझ्या मुलाने गाडी घेतली आहे मी पैसे देणार नाही. असे म्हणालेचा राग मनात धरून सचिव सुनिल मनोहर जाधव यांनी माझ्या सोबत हुज्जत घालून मला काठीने डाव्या मांडीवर, डाव्या हातावर व उजव्या गालावर काठीने मारहाण केली व शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याने फिर्यादी तेथून निघून दौड पोलीस स्टेशन येथे आले. पोलीसांनी औषधोपचारासाठी मेडिकल यादी दिली. औषधोपचार करून सदर घटने बाबत दौड पोलीस स्टेशन येथे सचिव सुनिल मनोहर जाधव रा हिंगणीबेडर्डी ता दौड जि पुणे याचे विरूद्ध कायदेशीर तक्रार दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल सपोनि गटकुळ - पो हवा लोहार- पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन

मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये

आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!