उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्य वाटप
By : Polticalface Team ,23-07-2024
दौंड( प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्याचे कणखर नेते मा.ना. श्री अजित अनंतराव पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने न्यू .महाराष्ट्र झोपडपट्टी विकास दल चे अध्यक्ष श्री नागसेनजी धेंडे यांच्या मार्फत दौंड येथे विविध असे कार्यक्रम घेण्यात येत आहेत त्यातला पहिला कार्यक्रम स्व. सुभाष अण्णा कुल मतिमंद व बहुविकलांग मुलांची शाळा दौंड जिल्हा पुणे येथे दिव्यांग बालकांना अन्नधान्य वाटप व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, शाळेच्या प्रांगणा मध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत झाले व प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य तसेच दिव्यांग बालकांना अन्नधान्य वाटप करून उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नागसेनजी धेंडे, प्रमुख पाहुणे भारतजी सरोदे, सामाजिक कार्यकर्ते मा.जयदिप बगाडे, पत्रकार मा.रमेश चावरिया, मा.शाम नौगिरे,मा. सुभाष शिंदे, मा.धरम(पप्पू )बनसोडे, मा. जेम्स पॉल मा.ओंकार कद्दे, मा.सुरज सरोदे, मा.प्रबोधन धंडे,सह आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून त्यांच्या हस्ते दिव्यांग बालकांना गोड खाऊ वाटप करण्यात आला.यावेळी सर्व मान्यवरांनी दिव्यांग मुलांच्या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले प्रमुख पाहुणे श्री भारत सरोदे म्हणाले की, दिव्यांगां साठी वेळ देऊन त्यांची सेवा करणे ही खरोखरच कौतुकाची बाब आहे अशा वंचित घटकांना आपल्या सर्वसामान्य प्रवाहामध्ये सामावून घेणे ही समाजातल्या सर्व घटकांची प्रथम जबाबदारी आहे तर अध्यक्ष भाषणात मा. नागसेन धेंडे म्हणाले की, शिक्षक क्षेत्रामध्ये न्यू महाराष्ट्र झोपडपट्टी विकास दल दौंड गेल्या अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबवत असते मा. श्री अजित दादा पवार साहेब यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो नेहमीप्रमाणे यावर्षी न्यू महाराष्ट्र झोपडपट्टी विकास दल यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवत आहोत आणि हे माझ्यासोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने शक्य होत आहे . समाजातल्या प्रत्येक घटकाला सन्मानाने राहता यावे याकरिता समाजातील सुशिक्षित पिढीने पुढे येऊन दिव्यांग, दीनदुबळ्या लोकांसाठी काम केले पाहिजे हा उद्देश पुढे ठेवून आदरणीय अजितदादा पवार यांचा विचार समाजामध्ये पुढे नेण्याचं काम आम्ही सर्व करीत असतो, न्यू महाराष्ट्र झोपडपट्टी विकास दल यांच्यामार्फत स्व.सुभाष आण्णा कुल असता,मा.शरद पवार साहेब,मा.रामदासजी आठवले साहेब व सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त पण विविध उपक्रम राबविले आहेत, यावेळी मा.जयदिप बगाडे म्हणाले की, नागसेजी धेडे हे नेहमीच समाजातल्या विविध घटकांना न्याय मिळेल याकरिता काम करीत असतात आणि त्यांच्या या उपक्रमात आम्ही पण सहभागी झालो याचा आम्हाला खूप आनंद वाटतोय, खरोखरच असे कार्यक्रम हे नेहमी झाले पाहिजे आणि समाजाची सेवा आपल्या हातून पण घडावी हा मोठा मेसेज या कार्यक्रमाच्या निमित्ताने दौंड च्या स्वाभिमानी जनतेला देता येऊ शकतो." यावेळी मा.प्रशात भंडारी यांनी योग्य वेळ उपलब्ध करून दिला, कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत श्री.अविनाश कवठे, श्री प्रशांत कदम यांनी तर सूत्रसंचालन श्री दिगंबर पवार यांनी केले तर आभार श्री निलेश गोराडे व गिरीश हिप्परगी, यांनी मांडले कार्यक्रमातला मेहनत, श्री दिनेश पाटील, विनोद मराठे, संजय बनसोडे विक्रम शेलार, नितिन गुनवरे, विशाल कनेॆवार, यांनी घतली
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी कारवाईची मागणी
मराठी चित्रपट लवेरिया थेट YouTube वर रिलीज; १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी परीक्षेत श्रीगोंद्यातील दोन सख्या बहिणींनी केले यश संपादन
नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वृक्ष लागवडीचे घोडे अडले कुठे? , पाच वर्षांनंतरही वनविभागाचे अधिकारी वृक्ष लागवडी बाबत अनभिज्ञ नंदकुमार कुरुमकर
भारतीय बौध्द महासभा कोरेगाव मूळ ग्रामशाखेच्या वतीने माता रमाई जयंती साजरी. समता सैनिक दलाची साप्ताहिक परेड संपन्न.
बिबट्याच्या दहशतीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला जंगलात राहिल्यासारखे वाटते
लिंपणगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्याचा मनमानी कारभार चव्हाट्यावर! , ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या एकाधिकारशाही विरुद्ध आमरण उपोषण करणार- विजय ओहोळ
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरी व घरफोडी करणारी टोळी जेरबंद.१४ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड. दोन आरोपी अटक
पाटस येथे तक्षशिला बुध्द विहारात रमाई माता जयंती उत्साहात साजरी. संघर्षमय माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रबोधन.
भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा उरुळी कांचन. माता रमाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी.
केंद्र सरकारने केलेले नवीन चार कामगार कायदे रद्द करावे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी इंटर जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी सुरज चव्हाण यांची फेरनिवड
करमाळा पोलीस स्टेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळास तालुक्यातुन प्रथम क्रमांकाचे बक्षिस
न्यू इरा पब्लिक स्कूल मध्ये महिला पालक हळदी-कुंकू समारंभ संपन्न
यवत गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी यात्रा उत्सवानिमित्त. मंगला बनसोडे मा.नितिनकुमार बनसोडे (करवडीकर) व मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळ (नारायणगांवकर) यांचा बहुरंगी तमाशा
श्रीगोंद्यातील वांगदरी गावचे सुपुत्र शिक्षक नेते आबासाहेब जगताप यांची राष्ट्रीय शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड - शिक्षक नेते पदी बाळासाहेब झावरे
बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण
पेडगाव येथे दारू, गुटखा, अमली पदार्थ, विक्री विरोधात पार पडली विशेष महिला ग्रामसभा.
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात फूड फेस्टिवल, पुष्प रचना सजावट, फनी गेम्स, संगीत खुर्ची या उपक्रमांना उदंड प्रतिसाद
नागवडे कारखान्याकडून चालू ऊस गाळपास उच्चाअंकी ऊस भाव , एरंडोली ग्रामस्थांकडून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा सन्मान