By : Polticalface Team ,25-07-2024
भिम छावा संघटनेचे अध्यक्ष शाम गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी भर पावसात भिजत ठिक ठिकाणी जाऊन नागरिकांची भेट घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला. कोणाचीही गैरसोय होऊ नये. अशी व्यवस्था सहकाऱ्यांनी करण्याचा प्रयत्न केला. सदर झोपडपट्टीतील नागरिकांचे जीवनावश्यक मूल्यवान वस्तू कागदपत्र भांडे व घरांची मोठ्या प्रमाणात झालेली नुकसान अतिशय जीवाला धक्का देणारी आहे. अशा परिस्थिती मध्ये त्यांना रात्री पासून अंन्न पाणी मिळणे हे देखील मुश्किल झाले आहे. या दृष्टीने महत्त्वाचे सहकार्य केले आहे. घरामध्ये गुडगाभर पाणी साठले आहे. घरातील सर्व साहित्य पाण्यात भिजवून गेले आहेत अंगावरील कपडे व बिछान्या सहीत पावसाच्या पाण्यात भिजवून गेले आहेत. तोंड पुसायला देखील कोरडा रुमाल राहीला नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून आज दि २५ जुलै २०२४ रोजी भिम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शाम गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची भेट घेऊन अतिशय महत्त्वपूर्ण नागरी हक्क सुरक्षा बाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले असून या बाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घ्यावे अशी विनंती करण्यात आली आहे.
या वेळी भिम छावा संघटनेचे अध्यक्ष शाम गायकवाड, निलेश गायकवाड, मारूती बनसोडे, मंगेश कांबळे,अनिकेत पालखे, सोहन पवार,तेजस चंदनशिवे, संघभूषण साखरे, आदी भिम छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
वाचक क्रमांक :