पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची सौ. अनुराधाताई नागवडे यांच्याकडून पाहणी

By : Polticalface Team ,28-07-2024

पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची सौ. अनुराधाताई नागवडे यांच्याकडून पाहणी नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव (प्रतिनिधी)--पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा घोड नद्यांना महापुर आल्याने श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदी काठावर असलेल्या गावांना या महापुराचा फटका बसत शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा जिल्हा बँक संचालिका सौ अनुराधा नागवडे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करत शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत पूरग्रस्त भागातील शेतकरी व ग्रामस्थ यांना धीर देत संवाद साधला. श्रीगोंदा तालुक्यात मागील आठ दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला असतानाच पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीला महापुर आल्याने भीमा नदीच्या काठावरील गार, कौठा, अनगर, आर्वी या गावांना पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. जोरदार पावसाने तसेच पुराने पेरलेला कांदा, उडीद, कापूस आदी पिकांची नासाडी झाली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. पावसाने प्रभावित झालेल्या क्षेत्रातील पिकांचे तात्काळ पंचनामे करत शासनास अहवाल सादर करण्याची सूचना तहसीलदार डॉ क्षितिजा वाघमारे यांना केली. यावेळी नागवडे कारखान्याचे संचालक विश्वनाथ दादा गिरमकर, प्रताप शिवलकर राजेंद्र चव्हाण, महेश कवडे, हनुमंत गिरमकर, पोपट नागवडे, बापूराव क्षिरसागर सुवर्णा नागवडे उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

केडगाव पाटबंधारे शाखेत सावळा गोंधळ. निवासी शाखा अधिकारी कर्मचारी मिळतील का ? वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ?

केडगाव स्टेशन (बोरीपार्थी) पाटबंधारे वसाहत सार्वजनिक श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीदत्त पालखी मिरवणूक. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न