पंढरपूर ते देहू जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या प्रवास दरम्यान यवत नगरीतील ग्रामस्थांनी उत्साहात केले स्वागत.

By : Polticalface Team ,28-07-2024

पंढरपूर ते देहू जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या प्रवास दरम्यान यवत नगरीतील ग्रामस्थांनी उत्साहात केले स्वागत. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २८ जुलै २०२४ जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा. आषाढी एकादशी पंढरीची वारी करुन जातो माघारी पंढरीनाथा। तुझे दर्शन झाले आता ।। हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अशी मनोभावे प्रार्थना व्यक्त करत. पंढरपूरातील गोपाळकाला आनंदाने साजरा करुन विठ्ठल नामाचा गजर करीत राम कृष्ण हरि नामस्मरणात मोठ्या उत्साहात वारकऱ्यांनी परतीचा प्रवास दि २१ जुलै रोजी सुरू केला. पालखी सोहळ्यातील विविध ठिकाणच्या एकुण ४०० वारकरी दिंड्या पंढरपूर ते देहू परतीच्या वाटेवर प्रवास करत असताना जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी रथ दि २७ जुलै रोजी दौंड तालुक्यातील मौजे वरवंड ता दौंड जिल्हा पुणे येथे रात्री मुक्कामी होती. रविवारी पहाटे ५ वा. पालखीने प्रस्थान केले या दरम्यान चौफुला भांडगाव येथिल ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले. पुढे प्रवास करीत पालखी सोहळा सकाळी १० च्या सुमारास यवत नगरीत दाखल झाला या वेळी यवत येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर येथे विश्रांतीसाठी विसावला घेण्यात आला. या प्रसंगी पालखी सोहळ्यातील वारकरी व दिंडीतील बांधवांच्या भोजनाची व्यवस्था यवत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूर ते देहू परतीच्या प्रवासासाठी रविवार ( दि. २१ जुलै रोजी ) प्रस्थान केले असून. दि २५ जुलै रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यात प्रवेश केला असुन बुधवार ( दि.३१ ) रोजी देहू येथे पोहचणार असल्याचे पालखी विश्वस्त व पालखी सोहळा अध्यक्ष मा पुरुषोत्तम मोरे यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले आजचा मुक्काम लोणी काळभोर ( कदमवाक वस्ती ) येथे असून दि. २९ नवी पेठ - पुणे, दि. ३० पिंपरी गाव या प्रमाणे मुक्काम करून बुधवार दि. ३१ जुलै रोजी पालखी सोहळा देहू मध्ये दाखल होईल असे पालखी सोहळ्याचे मुख्य विश्वस्त मा पुरुषोत्तम मोरे यांनी सांगितले. पूर्वी परतीच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी अत्यल्प असत व प्रवासात नागरिकांचाही फारसा प्रतिसाद मिळत नसे परंतु अलीकडच्या काळात परतीच्या प्रवासामध्ये वारकर्‍यांची संख्या वाढली असून प्रवासा दरम्यान सर्व गावात नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी दिली दरवर्षी प्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्यातील मौजे वरवंड येथील मुक्कामा नंतर उरुळी कांचन या ठिकाणी मुक्कामासाठी दाखल असायचा परंतु या प्रसंगी पालखी सोहळा पंढरपूर कडे जात असताना उरुळी कांचन ता हवेली जिल्हा पुणे येथे घडलेल्या प्रकारामुळे या वर्षी पालखी सोहळाचा परतीचा मुक्काम उरुळी कांचन येथे न करता लोणी काळभोर कदम वाक वस्ती येथे होणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. यवत येथील श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी तसेच समस्त ग्रामस्थ गावकरी युवा तरुणांनी मोठ्या उत्साहात पाहाटे पासूनच एक हजाराहून अधिक नागरीकांच्या भोजनाची तयारी करण्यात आली होती. अशी माहिती श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी यांनी दिली. या प्रसंगी हभप नानासाहेब दोरगे महाराज. अध्यक्ष सतीश दोरगे माजी अध्यक्ष शंकरराव दोरगे पाटील. कैलास आबा दोरगे, दत्तात्रय दोरगे पाटील. चंदकांत दादा दोरगे. माजी पोलीस उपनिरीक्षक बबनराव गायकवाड. अशोकराव दोरगे. दिलीप दोरगे. गणपतराव दोरगे. आदी यवत पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात पालखी विश्रांती दरम्यान यवत नगरीतील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काही काळ विश्रांती घेतल्या नंतर पालखी सोहळा सकाळी ११.३० वाजे सुमारास यवत नगरीतील समस्त ग्रामस्थ गावकऱ्यांचा निरोप घेत पुढील प्रवास देहुकडे प्रस्थान झाले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष