भावनिकतेच्या व जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाचेच राजकारण टिकते...चिखलठाण येथील कुगाव ते जेऊर रस्ता भूमिपूजन प्रसंगी आमदार संजयमामा शिंदे यांचे प्रतिपादन

By : Polticalface Team ,29-07-2024

भावनिकतेच्या व जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाचेच राजकारण टिकते...चिखलठाण येथील कुगाव ते जेऊर रस्ता भूमिपूजन प्रसंगी आमदार संजयमामा शिंदे यांचे प्रतिपादन

करमाळा प्रतिनिधी 

          विकास ही चिंतन चालणारी प्रक्रिया आहे. चालू पंचवार्षिक मध्ये सरकार स्थापन व्हायला लागलेला वेळ, कोविड तसेच सरकारची पाडापाडी असा काळ वजा जाता फक्त 24 महिन्यांचा काळ तालुक्यातील विकास कामे करण्यासाठी मला मिळाला. या 24 महिन्यात जवळपास 2500 कोटी रुपयांची विकास कामे आपण केली.हेच विकासाचे राजकारण भविष्यात टिकणारे असते.मतदार सुज्ञ आहे. त्यामुळे भावनिकतेच्या व जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाचेच राजकारण भविष्यकाळात टिकणार आहे असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी बहुचर्चित मौजे - चिखलठाण नं.1 येथे कुगांव- चिखलठाण - शेटफळ - जेऊर प्रजिमा 11 या 13 कोटी 50 लाख रुपये निधी च्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मा.सौ. सुनिता पाटील मॅडम,उप अभियंता मा.उबाळे साहेब,चिखलठाण गावचे माजी सरपंच मा.चंद्रकांत काका सरडे, माजी जि.प.उपाध्यक्ष,मा.राजेंद्र बारकुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मा.बाळकृष्ण भाऊ सोनवणे,कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष मा.सुनिलबापू सावंत,लव्हे गावचे सरपंच मा.विलासदादा पाटील, महाराष्ट्र केसरी पै.मा.चंद्रहासबापू निमगीरे,वाशिंबे गावचे सरपंच मा.तानाजीबापू झोळ आदी उपस्थित होते.

           पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, 2014 पासून या रस्त्याची मागणी केली जात होती. आता हा रस्ता पूर्ण होत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार हे काम होत असल्याने 15 ते 20 दिवसात हा रस्ता पूर्ण होईल. मध्यंतरी सरकार अस्थिर होते त्यामुळे या कामाला उशीर झाला. त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय काम करता येत नव्हते. आता हे काम पूर्ण होणार आहे.तालुक्यातील अनेक प्रलंबित कामे मी पूर्ण करत आहे. 5 वर्षात विकासाची सगळीच प्रक्रिया पूर्ण होत नसते.मात्र लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा जो पाठपुरावा करणे आवश्यक असते ते काम मी करत आहे. त्यातूनच दहिगावसाठी सर्वात जास्त निधी आणला. डिकसळ पुलाचे कामही मी पूर्ण करत आहे. राजकारण हे विकास कामावरच टिकत असते ते कोणाच्या पुण्याईने टिकत नसते .टेंभुर्णी- जातेगाव हे काम देखील लवकरच सुरु होणार आहे.चिखलठाण ते जेऊर या रस्त्याचे काम अत्याधुनिक पद्धतीने होत असून पहिल्यांदाच ही प्रक्रिया येथे राबवली जात आहे. तालुक्यातील वीज, शेती, सिंचन, रस्ते या कामासाठी आपण प्रयत्न करत आहे, असेही आमदार शिंदे म्हणाले.

           या कार्यक्रमासाठी संपूर्ण तालुक्यातून आमदार संजयमामा शिंदे गटातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्यामराव गव्हाणे यांनी केले. याप्रसंगी सचिन गावडे ,विलासदादा पाटील,महेश बोराडे, रवींद्र वळेकर, सत्यवान लबडे, सुनील सावंत, राजेंद्रकुमार बारकुंड,चंद्रकांत सरडे ,सुहास गलांडे यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास दोलतडे यांनी केले. यावेळी तरडगाव चे सुदाम शेठ लेंडवे, तात्यासाहेब जाधव पाटील, अजिंक्य पाटील केडगावचे नेते मा.शंभूशेठ बोराडे,झरे गावचे युवा नेते मा.प्रशांत पाटील,मा.नागनाथ पाटील,मा.सुभाष अभंग,मा.डॉ.गोरख गुळवे,मा.संतोष गायकवाड,मा.महादेव पोळ,मा.सुजिततात्या बागल,मा.अमर भांगे,मा.पै.उमेश इंगळे,शेटफळ गावचे माजी सरपंच मा.विकास गुंड,मा शिवाजी पोळ,मा.गणेश कानगुडे,नेरले गावचे सरपंच मा.समाधान दोंड,निंभोरे गावचे सरपंच मा.रवि वळेकर, स्वप्निल पाडुळे मा.मारुती गुटाळ,मा.राजेंद्र धांडे,मा.रोहिदास सातव,मा.अशोक तकीक,मा.आशिष गायकवाड, वांगी नं.३ गावचे सरपंच मा.मयुर रोकडे,मा.सुहास नाना रोकडे,मा.सोमनाथ रोकडे,सोगांवचे सरपंच मा.विनोद सरडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मा.शंकर पोळ,मा.अजिंक्य पाटील,मा.सुहास गलांडे सर,वीट गावचे माजी सरपंच मा.उदय ढेरे,केमचे युवा नेते मा.गोरख पारखे सर, तसेच गावातील जेष्ठ नागरिक मा.शामराव गव्हाणे,मा.सचिन गावडे,मा.दादा सरडे,मा.जोतीराम पवार,मा.सचिन सरडे,मा.गव्हाणे साहेब तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट

मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन

आठवण शाळेची....उत्सव मैत्रीचा.. तब्बल 38 वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र. 2009 पासुन विद्यार्थ्यांची छडी बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .

पद्म पंडित प्रतिष्ठानच्या वतीने कंदर येथे गुणवंतांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना बॅग तसेच पाण्याची बॉटल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

आज योग दिनाचे महत्त्व व गरज

राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड

पारधी समाज रस्त्यावर, शासनाच्या योजनांपासून वंचित पक्क्या घरासाठी प्रशासनाकडे वंचितचे निवेदन