By : Polticalface Team ,30-07-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी )-राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आपला वेगळा गट निर्माण केला असल्याने श्रीगोंदा तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी अजित दादा पवार गटाला समर्थन दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी तालुक्यातील व जिल्ह्यातील रिक्त पदांवर नव्याने नियुक्ती करण्याचे धोरण निश्चित केले होते. कोपरगाव येथे आयोजित बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा अभ्यासू व प्रशासनाची जवळीक असलेले नागवडे कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव शिंदे यांची श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर; अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; यांच्या शुभहस्ते नियुक्तीचे पत्र देऊन निवड करण्यात आली. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आपला वेगळा गट निर्माण केल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलले आहेत.
खासदार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे व विचारांशी जोडलेल्या कार्यकर्त्यांनी अजित दादा पवार यांच्या गटाला पसंती दिली आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन अजित पवार गटाचे विचार सर्वत्र पोहोचण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी भक्कमपणे आज उभे आहेत .पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी युवा अभ्यास व प्रशासनावर चांगली पकड असणारे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांचे अत्यंत विश्वासू व जवळचे समजले जाणारे सुभाषराव शिंदे यांची तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे. या निवडीनंतर बोलताना नूतन तालुकाध्यक्ष श्री शिंदे पुढे म्हणाले की; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी काम करणार आहे. श्रीगोंदा तालुक्यात निश्चितच पक्ष वाढीसाठी कटीबद्ध असून; पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य होईल असे श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
नूतन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाषराव शिंदे यांचे निवडीबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; राज्य महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर; राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा; महिला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ अनुराधाताई नागवडे यांच्यासह नागवडे कारखान्याच्या संचालक मंडळ व सभासदांनी श्री शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.