प्रदीर्घ सेवेतून गोरख बांदल सर सेवानिवृत्तसेवानिवृत्ती बद्दल वांगदरीच्या नागवडे विद्यालयकडून श्री बांदल सर यांना निरोप
By : Polticalface Team ,30-07-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी) -श्री बांदल जी. के सर दिनांक 31/7/2024. रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांचा सेवापुर्ती कार्यक्रम श्री शिवाजीराव नारायनराव नागवडे विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वांगदारी गावचे माजी सरपंच महेशशेठ नागवडे हे होते. व प्रमुख अतिथी दिग्विजय नागवडे ( आण्णा ),व निरीक्षक श्री लगड बी के सर हे होते. तसेच गावातील सरपंच सर्व पदाधिकारी, नातेवाईक, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य भिसे सर यांनी केले. अनेक विध्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त करून श्री बांदल सरांना शुभेच्छा दिल्या. दिग्विजय नागवडे यांनी गुरूंचे महत्व विषद केले करत आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत हे सांगितले. तुम्ही आमच्यावर प्रेम करा आम्ही दुप्पट प्रेम करू असे सांगुन बांदल सरांना भावी जीवनसाठी दिग्विजय नागवडे यांनी शुभेच्छा दिल्या. श्री. बी के लगड सर निरीक्षक ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक शुभेच्छा देताना म्हणाले की ;नोकरी कसी लागली या पासून ते निवृत्ती पर्यंतचा इतिहास सांगुन शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष महेश शेठ नागवडे यांनी त्यांच्या जुन्या आठवणीं सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून बांदल सरांना शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यालयातील सर्वच कर्मचारी वृंद यांनीही शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना बांदल सर यांनी स्व शिवाजीराव नागवडे तथा बापू यांच्या आठणींना उजाळा देत त्यांच्या प्रति ऋण व्यक्त केले. तसेच आपल्या 31वर्षाचा अनुभव विषद केला.सूत्रसंचालन जगताप. बी. एस. सर यांनी केले तर आभार अक्षय बांदल सर यांनी मानले.
वाचक क्रमांक :