By : Polticalface Team ,31-07-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड
दौंड ता ३० जुलै २०२४ रोजी दौंड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्यावर दि ०१ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२४ पर्यंत. दौंड जनसंवाद पदयात्रा प्रचार कार्यक्रमाच्या निमित्ताने दि ३० जुलै रोजी मौजे केडगाव ता दौंड जिल्हा पुणे. येथील रॉयल हॉटेल मध्ये देशभक्त केशवराव जेधे फाऊंडेशनचे अध्यक्ष व आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते. दिग्विजय सर्जेराव जेधे यांनी पत्रकार परिषद घेऊन दौंड जनसंवाद पदयात्रे बाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
शिवकालीन पाच संस्थांपैकी एक असलेले जेधे घराण्यातील केशवराव जेधे यांचे पंतू श्री.दिग्विजय सर्जेराव जेधे व त्यांच्या सहकाऱ्यांसह मौजे पारगाव ता दौंड जिल्हा पुणे येथून बुधवार दि ०१ ऑगस्ट पासून ते १३ ऑगस्ट,२०२४ या कालावधीत दौंड जनसंवाद पदयात्रेला प्रारंभ होणार असुन आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दौंडच्या सर्वांगीण विकासासाठी या पदयात्रेत मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दौंड जनसंवाद पदयात्रेकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. १३ दिवस पदयात्रेच्या माध्यमातून १०० पेक्षा अधिक गावातील लोकांना भेट देऊन. किमान रोज २४ किलो मीटर अंतरा पर्यंत पायी चालत रात्रीच्या वेळी गावातच मुक्काम करून संवाद साधला जाणार आहे. दौंड तालुक्यात ३०० किलोमीटर पेक्षा अधिक पायी प्रवास करून शरदचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्र राज्यातील विकासासाठी आखलेल्या धोरणांची व त्यांच्या विचारांची शिदोरी दौंड विधानसभा मतदार संघाच्या कानाकोपऱ्या पर्यंत पोहोचवण्यासाठी या दौंड जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून दौंड तालुका पुढील काळात शहरीकरणाच्या उंबरठ्यावर असताना शहरीकणाचे विस्तारीकरण मोठ्या झपाट्याने होणार आहे. गेली २५ ते ३० वर्षा मागील परस्तीती पाहता शोकांतिका दिसत आहे.
महाराष्ट्रामध्ये अतिशय हिण खालच्या दर्जाचे राजकारण चालले आहे. घरा घरात भांडणे लावणे मोठ मोठे पक्ष फोडणे अशा प्रकारे दबाव तंत्राचा वापर करून राजकारण करून सत्तेची समीकरणे जुळवण्याचा घाट घातला जात आहे या महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी विचार मागे पडत चालला आहे. या जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून लोक जनजागृती व जनसंवाद साधला जाणार असल्याचे दिग्विजय जेधे यांनी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले १९५७ साली माझे पंजोबा मा.केशवराव जेधे यांनी स्वातंत्र्या नंतर पहिली बारामती लोकसभा निवडणुक संपूर्ण मतदारसंघ पदयात्रा करुन पिंजून काढत प्रचार केला व विजयी झाले. त्यांच्या नंतर अनेक निवडणूका झाल्या मात्र निवडणूक दरम्यान कोणत्याही राजकीय नेत्यांनी पदयात्रा केली नाही. येणाऱ्या विधानसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा केशवराव जेधे यांची पुनरावृत्ती करत. दौंड जनसंवाद पदयात्रा काढून तब्बल शंभर पेक्षा जास्ती गावांना भेट देऊन सर्वसामान्य नागरिकांशी जनसंवाद साधणार असल्याचे दिग्विजय सर्जेराव जेधे यांनी सांगितले.
दौंड विधानसभा निवडणुकीच्या मैदानात दिग्विजय सर्जेराव जेधे उतरणार असल्याने येणाऱ्या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार. की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात असुन. या बाबत राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते मंडळी आणि गाव निहाय राजकीय पुढारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार चर्चेला उदान आले आहे. दौंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनेक दिग्गजांनी गुडघ्याला बाशिंगे बांधले असून भिंगरी प्रमाणे परिस्थिती दिसून येत आहे. परंतु येणाऱ्या दौंड विधानसभा निवडणुकीत ( आमदार पदाच्या ) घोड्यावर बसणार कोण ? या बाबत अनेकांची गाणितं बिघडणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा. तुम्ही फक्त लढ म्हणा.
एक ऑगस्ट पासून. दौंड जनसंवाद पदयात्रेला प्रारंभ.
सदर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिग्विजय जेधे यांचे वडील मा सर्जेराव जेधे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले. मा केशवराव जेधे यांच्या बाबत सागायचे म्हटले तर गेल्या ११५ वर्षां पासून आधुनिक महाराष्ट्राच्या जडण घडणीत जेधे परिवाराचे नेतृत्व आणि भूमिका दिशादर्शक ठरली आहे. बहुजन समाजाला राजकारणाच्या समाजकारणाच्या आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांनी दौंड तालुक्यात शिक्षण संस्थांची निर्मिती करण्या बाबत प्रमुख भूमिका बजावली आहे. बारडोली सत्याग्रह पर्वती सत्याग्रह आणि मिठाच्या सत्याग्रहात संपूर्ण पुण्यात पदयात्रा काढुन जनजागृती केली होती, तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर १९४२ च्या चले जाव सायबर आंदोलना मध्ये त्यांना तुरुंगवास झाला होता, भारतीय संविधान समितीचे सदस्य, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या अध्यक्ष, गोवा मुक्ती संग्रामाचे नेतृत्व करणे बाबत तसेच, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीत प्रामुख्याने सहभागी होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर सुभाषचंद्र बोस - गांधी - सरदार पटेल यांसारख्या राजकीय नेतृत्वाच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रनिर्मितीचे कार्या बाबत मोलाची कामगिरी बजावली आहे तसेच शेतकरी कष्टकरी व शोषित पिढीत वर्गासाठी संघर्ष करणे अशी अनेक महान कार्ये देशभक्त केशवराव जेधे व समाजभूषण बाबूराव उर्फ आप्पासाहेब जेधे यांच्या हातून घडली आहेत. त्यांच्या नंतर हा वारसा पुढे सतत सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला ते समाज सेवक कै.शिवाजीराव जेधे आणि पारगावचे मा.सरपंच श्री.सर्जेराव जेधे. यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी अतुलनीय योगदान दिले. या राजकीय व सामाजिक कार्याची धुरा वाहण्याचा संकल्प करून मा.श्री.शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ८०% समाज कारण व २०% राजकारण हे सूत्र गेल्या १५ वर्षां पासून अवलंबत आहे. अशी प्रतिक्रिया दिग्विजय सर्जेराव जेधे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोलताना व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात असलेले कान्होजीराजे जेधे, बाजी सर्जेराव जेधे, व देशभक्त केशवराव जेधे, बाबूराव जेधे, शिवाजीराव जेधे आणि समाजकार्यात अग्रेसर राहिलेले माझे वडील सर्जेराव जेधे... जेधे घराण्यातील या महत्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांनी कर्तबगारीचा रचलेला देदीप्यमान वारसा पुढे चालवत असताना दौंड तालुक्यातील सर्वच समाज घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असुन या ध्येयामागे माझे नेते व मार्गदर्शक मा.श्री. शरदचंद्र पवार साहेबांची प्रेरणा असल्याचे दिग्विजय जेधे त्यांनी सांगितले. जेधे परिवाराशी पवार घराण्याचे शंभर वर्षां पूर्वी पासून ऋणानुबंध जुळले आहेत. केशवराव जेधे यांनी लोकसभेची निवडणूक १९५७ साली बारामतीतून लढवली आणि ते लोकसभेमध्ये निवडून गेले. त्यांच्या मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं लक्ष शेवटच्या घटकांपर्यंत व माणसाचं हित जपण्यासाठी संघर्ष करत होते खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील एकमेव अत्यंत महत्त्वाचा लोकनेता बेस्ड् लीडर म्हणून मा केशवराव जेधे यांच्या पुनर्प्रकाशन सोहळ्यात मा शरदचंद्र पवार साहेबांनी बोलताना जाहीर पणे मत व्यक्त केले होते पुढे बोलताना ते म्हणाले केशवरावांनी माझ्या मातोश्रींना पुणे लोकल बोर्डाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत विजयी ही झाल्या. एका अर्थानं, माझ्याही घराण्याच्या राजकारणाची सुरुवात ही केशवराव जेधे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या माध्यमातून झाली ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे. केशवराव जेधेंनी उभं आयुष्य महाराष्ट्राला दिलं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे अनेक लोकं घडली. त्या लोकांच्यात आमच्या सारखे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आज इथंपर्यंत येऊन पोचलो आहोत. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब केशवराव जेर्धेच्या विचारांना अनुसरूनच महाराष्ट्राला व देशाला आजवर आकार देत आले आहेत. जेधे-पवार या दोन्ही परिवारांनी महाराष्ट्रासाठी व देशासाठी दिलेले योगदान अलौकिक आहे. त्यामुळे मी हाच वारसा पुढे चालवण्यासाठी आपल्या सेवेसी सज्ज आहे. म्हणून आदरणीय पवार साहेबांनी.
देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासासाठी आखलेल्या धोरणांची व त्यांच्या विचारांची माहिती दौंड मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी, मी दौंड जनसंवाद पदयात्रा आयोजित केली असल्याचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोलताना दिग्विजय जेधे यांनी सांगितले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने साहेबांनी मला दौंड विधानसभा निवडणुक लढविण्याची संधी दिली तर विधानसभा जोमाने लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले अंतिम निर्णय हा शरदचंद्र पवार साहेबांचा असेल असेही बोलताना त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर दौंड जनसंवाद पदयात्रा दरम्यान प्रचारार्थ जनसंवाद दौरा करून शेती, शिक्षण, रोजगार, महिला सबलीकरण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांतील समस्या जाणून घेत त्यावर उपाय शोधण्यासाठी आणि आपल्या दौंड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी ही पदयात्रा निर्णायक ठरेल हे नक्की अशी प्रतिक्रिया दिग्विजय जेधे यांनी व्यक्त केली असुन ! या पदयात्रेत दौंड तालुक्यातील १००हून अधिक गावांत ३०० कि मी पेक्षा अधिकचे अंतर पायी चालत
व काही ठिकाणी रात्रीच्या वेळी मुक्काम करून नागरिकांशी संवाद साधायला येत असल्याचे त्यांनी सांगितले. २०२४ ची आगामी विधानसभा निवडणूक समोर ठेवून, जनतेच्या समस्या थेट जाणून घेऊन. सदर अहवाल आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांपुढे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आपण बुधवार दि ०१ ऑगस्ट पासून ते १३ ऑगस्ट २०२४ या १३ दिवसीय दौंड जनसंवाद पदयात्रेत दौंडच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या संख्येने सामील व्हावे या संदर्भात दौंड तालुक्यातील मतदार नागरीक बांधवांना आवाहन करण्यात आले असून दि १३ ऑगस्ट २०२४ रोजी मोजे पारगाव येथे दौंड जनसंवाद पदयात्रेचा अखेर समारोप कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
वाचक क्रमांक :