चक्रीवादळाने लोणी व्यंकनाथ येथील संतोष आल्हाट यांच्या दोडका बागेचे छत उडाल्याने मोठे आर्थिक नुकसान

By : Polticalface Team ,31-07-2024

चक्रीवादळाने लोणी व्यंकनाथ येथील संतोष आल्हाट यांच्या दोडका बागेचे छत उडाल्याने मोठे आर्थिक नुकसान

      लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शेंडेवाडी येथील शेतकरी संतोष भिमाजी आल्हाट यांच्या दीड एकर दोडका बागेतील अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे मंडप उडाल्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी संतोष आल्हाट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हा प्रकार लोणी व्यंकनाथ च्या शेंडेवाडी येथील संतोष आल्हाट यांच्या गट नंबर 597 या क्षेत्रात नुकसान झाल्याचे समजले. एकीकडे शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती सुधारत असताना भाजीपाला व इतर पिके कमी कालावधीत घेऊन अधिक उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करत असतानाच निसर्ग मात्र शेतकऱ्यांना हाता तोंडाशी आलेले पीक हिरावून घेत आहे. असाच प्रकार मंगळवार दिनांक 30 जुलै रोजी सायंकाळी साधारणतः चार वाजता अचानक चक्रीवादळ फिरले आणि होत्याचे नव्हते झाले लोणी व्यंकनाथ येथील गरीब कुटुंबातील शेतकरी संतोष आल्हाट यांनी दोन महिन्यापूर्वी दोडक्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये दोडक्याची शेती करत असताना या पिकाला बाधा येऊ नये म्हणून चहूबाजूने सुरक्षिततेसाठी मंडप उभारला त्यासाठी या मंडपाला जवळपास दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. 

        सदर दोडक्याची पीक बाधित होऊ नये म्हणून वेळोवेळी विविध प्रकारच्या फवारणी केल्या. आता हे पीक काही दिवसातच हाती लागणार होते. परंतु अचानकच्या चक्रीवादळाने जवळपास साडेपाच ते सहा लाख रुपयेचे संबंधित शेतकऱ्यांना मिळणार होते. परंतु अचानक चक्रीवादळाने दोडका पिकावरील मंडप उडून गेला या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.

      दरम्यान या नुकसानग्रस्त पिकाची प्रत्यक्ष दर्शनी पाहणी केल्यानंतर संबंधित शेतकरी संतोष आल्हाट व त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. या दोडक्याच्या उत्पन्नासाठी आल्हाट कुटुंबीयांनी तळहाताप्रमाणे या पिकाला जोपासले. त्यामध्ये सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे दोडका पिकाची संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्याने उत्तम प्रकारे जोपासना केली. आता हे पीक काही दिवसातच हाती लागणार होते. परंतु चक्रीवादळाने दोडका पिकावरील छेत कोसळल्याने संपूर्ण दोडका पीक हस्तव्यस्तपणे पडले. त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासन नियमानुसार नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी संतोष आल्हाट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


     या नुकसानी संदर्भात तालुका कृषी अधिकारी श्री सुपेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की; नैसर्गिक रित्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर महसूल विभागाला तो अधिकार आहे. तालुक्याचे तहसीलदार हे संबंधित तलाठी व मंडल अधिकारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी सूचना करतील. तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधावा असे तालुका कृषी अधिकारी श्री सुपेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


    श्रीगोंद्याचे तहसीलदार डॉ क्षितिजा वाघमारे यांच्याशी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडली. परंतु त्यांनी तालुक्यात कुठेच चक्री वादळ झाले नाही असा दावा करत मी देखील त्यादिवशी मंगळवारी लोणी व्यंकनाथ मध्येच होते. मला कुठेच त्यादिवशी लोणी व्यंकनाथ मध्ये चक्रीवादळ झाल्याचे दिसून आले नाही. असे सांगितले. त्यावर पत्रकारांनी त्यांना व्यंकनाथ येथील शेंडेवाडी या परिसरात अचानक चक्रीवादळ फिरले त्यामध्ये दोडका उत्पादक शेतकरी संतोष भिमाजी आल्हाट यांच्या दीड एकर क्षेत्रातील दोडका पिकावरील मंडप उडून गेला. त्यानंतर तहसीलदार यांनी मी चौकशी करून अहवाल मागवते असे उत्तर तहसीलदार डॉ क्षितिजा वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. 


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

टाकळी लोणार जि.प.प्रा.शाळेतील आदित्य मोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत निवड

टाकळी लोणार जि.प.प्रा.शाळेतील आदित्य मोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत निवड

नवरा बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव. आरोपी पती पत्नीवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. आंबेगाव येथील घटना.

तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पती पत्नीला मारहाण करून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. देऊळगाव राजे येथील घटना

शेळ्या चोरणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून गाडी थांबवली. दोन इसम आंधारामध्ये पळून गेले. एकास दौंड पोलीसांनी पकडले. तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

श्रीगोंद्यात मोहरम उत्सव उत्साहात साजरा

अहिल्यानगर जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील शिवपानंद शेख रस्ते प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढावीत , राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

स्वामी चिंचोलीच्या घटनेतील त्या दोन संशयित नराधमांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वरुणराजाच्या हजेरीत नागवडे स्कूल ची बालदिंडी उत्साहात संपन्न. बालदिंडी चे विक्रमी २५ वे वर्ष.

शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशाची अंमलबजावणीसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून दयावी. _जयवंत भाबड

शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश – औरंगाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू

करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन

मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये

आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू