By : Polticalface Team ,05-08-2024
आज दिनांक 05/08/2024 रोजी सकाळी 11.30 वाजता श्रीगोंदाचे तहसिलदार मा.क्षितिजा वाघमारे आणि नायब तहसिलदार बंड साहेब यांना आदिवासी पारधी समाजाच्या वतीने नविन रेशन कार्ड आणि विभक्त रेशन कार्ड साठी १०९ प्रस्तावाची नावे विविध गावातून सादर केले असून चेक करुण त्रुटी दुरुस्त करायला सांगू असे सांगण्यात आले
आणि निवेदन देऊन या आदिवासी पारधी समाजाला, भटके विमुक्त समाजाला रेशन कार्ड वितरित करण्यासाठीचा जी. आर.28 जून २०२४ रोजी प्रसिद्ध केला आहे त्यासाठी मतदान कार्ड, सरपंच/उपसरपंच रहिवाशी दाखला किंवा आधार कार्ड आणि जी. आर. सोबत असलेले हमीपत्र सादर करून रेशन कार्ड देणार असल्याची माहिती मा. तहसीलदार यांनी दिली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की,
आम्ही लोणी व्यंकनाथ येथील कायमस्वरूपी रहिवासी असून आम्ही सर्व आदिवासी पारधी समाजातील आहोत. आपल्या भारतीय संविधानात पहिलेच वाक्य आहे आम्ही भारताचे लोक पण आम्ही भारताचे लोक आहोत हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला 75 वर्षे लागली पण तरीही आम्हाला कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे आजही रेशन कार्ड नाहीत. रेशन कार्ड नसल्यामुळे कोणत्याच योजनेचा लाभ घेता येत नाही. स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नाही आम्ही भूमिहीन आणि व्यवसायाचे काहीच साधन नसल्यामुळे मुंबई पुणे सुरत हैदराबाद अशा ठिकाणी भीक मागायला जातो सोबत मुले ही असतात त्यामुळे मुलांना शिक्षण घेता येत नाही इच्छा असूनही ते शाळाबाह्यच राहतात. त्यामुळे आमच्या शिक्षण आरोग्य चे प्रश्न उभे राहतात. आमच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा याही पूर्ण होत नाहीत आज आम्ही खूप हलाखीचे दिवस काढत आहोत. आमच्याकडे कागदपत्रे ही कमी आहेत त्यामुळे आम्हाला स्थानिक चौकशीवरून रेशन कार्ड मिळावेत अशी पारधी समाजाने विनंती केली आहे.
यावेळी, सहारा सर्वांगीण विकास संस्थेचे अध्यक्ष आणि प्यारालिगल कार्यकर्ता संतोष भोसले , संविधान प्रचारक छाया भोसले, आसाराम काळे, कारू भोसले, अक्षय भोसले, तेजस भोसले, छकुली भोसले, दामिनी भोसले, कोमल भोसले, युवा भोसले, प्रवीण काळे, रविना काळे, उमेश काळे उपस्थित होते.
अशी माहिती सहारा सर्वांगीण विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष भोसले यांनी दिली.