श्रावणी महिन्यातील श्री यल्लमा देवीचे पाणी कार्यक्रम यवत येथे मोठ्या उत्साहात साजरा. दिपा रंजिता नायक यांच्या निवासस्थानी. जिल्ह्यातील तृतीयपंथींचा जमला मेळा.

By : Polticalface Team ,07-08-2024

श्रावणी महिन्यातील श्री यल्लमा देवीचे पाणी कार्यक्रम यवत येथे मोठ्या उत्साहात साजरा. दिपा रंजिता नायक यांच्या निवासस्थानी. जिल्ह्यातील तृतीयपंथींचा जमला मेळा.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०७ ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील तृतीयपंथी दीपा गुरु रंजिता नायक यांच्या निवासस्थानी दि ०६ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण महिन्यातील श्री यल्लमा देवीचे पाणी या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी समाजाचे प्रमुख गुरु रंजीता नायक (मालक) व जोगत्यांचे गुरु रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली दिपा गुरु रंजिता नायक यांनी यल्लमा देवीचे पाणी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन यवत येथील त्यांच्या निवासस्थानी केले होते. श्रावणी महिन्यातील श्री यल्लमा देवीचे पाणी या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील विविध भागात असलेले तृतीयपंथी समाजातील गुरु चेले व त्यांच्या सहकाऱ्यांनी यवत येथील तृतीयपंथी दीपा गुरु रंजिता नायक यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. श्रावण महिन्यातील यल्लमा देवीचे पाणी या प्रमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून सकाळी ७ ते ९ वाजे पर्यंत श्री यल्लमा देवीला पंचामृताने अभिषेक करण्यात आला. साडी चोळी खन नारळाची ओठी भरुन. देवीला सोन्या चांदीचे दागिने आरस करून विविध पदार्थ व फळांचा नैवेद्य पुजा पाठ व आरती करण्यात आली. या प्रसंगी परिसरातील जगदंबा अंबाबाई भवानी येडामाई देवीची परडी जोगते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता श्रावणी महिन्यातील श्री यल्लमा देवीचे पाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री यल्लमा देवीची मूर्ती रथात बसून यवत गावातून पारंपारिक ढोल ताशा पथक व फटाक्याच्या धुमधडाक्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यवत गावातील (रायकर मळा) मुळा मुठा कालवा. कॅनल या ठिकाणी गौरी बाई चे स्नान करून श्री यल्लमा देवीची आरती करण्यात आली. पुढे महालक्ष्मी व श्री काळभैरवनाथांची पुजा करुन तृतीयपंथी दीपा गुरु रंजिता नायक यांच्या निवासस्थानी मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी समाजाचे प्रमुख रंजीता नायक (मालक) व जोगत्यांचे गुरु रवी नायक यांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने बैठक घेण्यात आली. दौंड तालुक्याचे माजी आमदार रंजनाताई कुल यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने तृतीयपंथी दिपा गुरु रंजिता नायक यांच्या निवासस्थानी भेट दिली. या प्रसंगी तृतीयपंथी दिपा गुरु रंजिता नायक यांच्या हस्ते. माजी आमदार रंजनाताई कुल यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी श्री यल्लमा देवीच्या मंदिर सभागृहासाठी आमदार राहुल कुल नक्कीच मदत करतील असे आश्वासन माजी आमदार रंजनाताई कुल यांनी तृतीयपंथी दिपा गुरु रंजिता नायक यांना दिले या प्रसंगी दिपक महाराज. सपना गुरु आचल गौरी काश्मीरा मेहता आनिता स्वामी गणेश शेळके चैतन ढवळे अनिल गायकवाड बालाजी घोडके. बंडु राजगुरू शिवाजी ननवरे. राजेंद्र जैन. पंपु शिंदे. प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी पुणे जिल्ह्यातील विविध भागातून आलेले तृतीयपंथी गुरु चेले तसेच यवत पंचक्रोशीतील महिला व नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री ०९ वाजता छोटा अमोल मोठा अमोल सांगलीकर यांचे देवीच्या गाण्यांच्या कार्यक्रमाने व तृतीयपंथींच्या नृत्याने यवत पंचक्रोशीतील महिला पुरुष नागरिक थंक होऊन भारावून गेले होते. तृतीयपंथींचा नृत्य डान्स बॉलीवूड व लावणी महोत्सवाला तोडीस तोड ठरला या मध्ये उत्कृष्ट नृत्य कला सादर केली ती साहिल नृत्यांगना हिने ( डोक्यावर विना चुंभळ) पाण्याची कळशी घेऊन अतिशय सुंदर नृत्य सादर केल्याने उपस्थित महिला पुरुषांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. या वेळी यवत पंचक्रोशीतील महिला पुरुष नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन