By : Polticalface Team ,08-08-2024
लिंपणगाव ( प्रतिनिधी)--महाराष्ट्र शासन व श्रीगोंदा तहसिल विभाग यांच्या वतीने महसूल सप्ताह या कार्यक्रमांतर्गत युवा संवाद मेळाव्याचे आयोजन सोनिया गांधी पॉलिटेक्निक श्रीगोंदा येथे करण्यात आले . कार्यक्रमा साठी श्री.नेवसे साहेब नायब तहसीलदार श्रीगोंदा व श्री.खताळ साहेब सब रजिस्ट्रार श्रीगोंदा उपस्थित होते .श्री नेवसे साहेब यांनी विद्यार्थ्यांना लागणारे विविध स्वरूपाचे दाखले कसे काढायचे ,मतदार यादीमध्ये नवीन नाव कसे नोंदवावे तसेच आधार कार्डमध्ये कसे बदल करावेत यासंदर्भात मार्गदर्शन केले.त्याचबरोबर श्री.खताळ साहेब यांनी उच्च शिक्षणासाठी लागणारे कर्ज कसे मिळवावे व मालमत्ता नोंदी कश्या कराव्यात याचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य.श्री.अमोल नागवडे सर,सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.आळेकर सर यांनी तर आभार प्रा.गायकवाड सर यांनी मानले.