By : Polticalface Team ,08-08-2024
दौंड( प्रतिनिधी) दौंड तालुक्यातील देऊळगाव वाडा तालुका दौंड जिल्हा पुणे येथील मेंढपाळाचा मुलगा संदीप आनंदा कोकरे यांने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत पीएसआय पदाला गवसणी घातली आहे,या गावातील स्पर्धा परीक्षा यश मिळवणारा संदीप हा सहावा युवक ठरला आहे शालेय जीवनातील सुट्टी मध्ये मेंढ्या चारायला जाणाऱ्या संदीपच्या यशाचे सर्व परिसरातून कौतुक होत आहे, संदीपचे व वडील अंनदा कोकरे व आई चांगुना कोकरे निरक्षर आहेत पण त्यांनी संदीपला बकऱ्याचा व्यवसाय अलीकडे फार आवड आहे व शाळा शिक असा सतत सल्ला दिला, लोकसेवा आयोग पीएसआय या शब्दाचा कसलाही गंध त्यांना नाही निकर लागला तेव्हा आनंदा व चांगुना बकऱ्यामागे होते पण निकाल आल्यानंतर मात्र धनगर वाड्यात लोकांची गर्दी होऊ लागली लोकांच्या चर्चेतून कळालं की आपला पोरगा मोठा साहेब झाला संदीप फौजदार झाल्याने धनगर वाड्यात आनंद ओसडून वाहत होता निकाल लावल्यानंतर संदीप तीन दिवसांनी घरी आला होता त्यांनी आल्या आल्या आपल्या वडिलांना मिठी मारली आणि बापाचे आनंद अश्रू वाहू लागले, आईने लेकाला जवळ घेऊन मटा मटा मुक्के घेतले, संदीप एनटी मधून राज्यात नववा आला त्याचे शिक्षण न्हावरे येथील मल्लिकार्जुन विद्यालय तर उच्च शिक्षण हे वरवंड येथील एकनाथ दिवेकर विद्यालयामध्ये झाले संदीप ने कोणत्याही क्लास शिवाय यश मिळवले आहे त्याच्या या यशामुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे