By : Polticalface Team ,09-08-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०९ ऑगस्ट २०२४ दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे बोरीबेल ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी जंम्बा चाकु छातीवर मारुन (सासरे) सुदाम हिऱ्या चव्हाण यास जीवे ठार मारले.
असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या बाबत फिर्यादी. रहीना बाबुजी चव्हाण वय-२० वर्षे व्यवसाय घरकाम मजुरी रा. बोरीबेल ता दौंड जि-पुणे. यांच्या फिर्यादी वरून. आरोपी १) लकझ-या कोब्या काळे. रा लासुर्णे ता इंदापुर जि पुणे याचे विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे बोरीबेल ता दौंड जिल्हा पुणे येथील गावांमध्ये दि ०७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजे सुमारास हि धक्कादायक घटना घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की. आरोपी लकझ-या कोब्या काळे हा बोरीबेल या ठिकाणी सासर वाडीला आला होता. या वेळी सासरे सुदाम हि-या चव्हाण. आणि लकझ-या कोब्या काळे. यांच्यात किरकोळ कारणा वरून वाद निर्माण होऊन सासरे व जावाई यांच्यात बाचाबाची झाली. तु माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवतो आणि आमच्या घरी येऊन जेवतो. असे म्हणत लकझऱ्याला शिवीगाळ करत हातातील दगड फेकून मारला.
या प्रसंगी फिर्यादी रहीना बाबुजी चव्हाण यांनी आरोपी लकझऱ्या याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी लकझऱ्याने आपल्याकडे असणाऱ्या मोठ्या ( जंब्या ) चाकू सासऱ्याच्या छातीमध्ये खुपसला असल्याने सुदाम चव्हाण याला गंभीर दुखापत होऊन जख्मी झाला. व जास्त प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तो बेशुद्ध पडला. सासरे सुदाम चव्हाण यास जिवे ठार मारले. व आरोपी लकझऱ्या हा घटनास्थळा वरुन तत्काळ पळून गेला. असे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे. नातेवाईकांनी सुदाम चव्हाण त्यांना बेशुद्ध अवस्थेत दौंड येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. या वेळी डॉक्टरांनी सुदाम चव्हाण यास तपासणी करून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. फिर्यादी रहीना बाबुजी चव्हाण रा. बोरीबेल ता दौंड जि-पुणे यांनी दौंड पोलीस ठाण्यात आरोपी लकझ-या कोब्या काळे रा-लासुर्णे ता-इंदापुर जि-पुणे यांचे विरुध्द कायदेशिर फिर्याद दाखल केली आहे. दाखल-पोसई राउत. पोसई गोसावी पुढील तपास करीत आहेत. सदर घटनेची माहिती दौंड पोलिसांनी दिली.