By : Polticalface Team ,11-08-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
आज नामदेवराव जगताप उर्दू शाळे मध्ये नव्याने सुरू झालेल्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व पुस्तके वाटपाचा कार्यक्रम भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने सन राईस क्लासचे संचालक मा. प्रा इब्राहीम मुजावर सर, प्रसिद्ध डॉक्टर समीर बागवान, प्रसिद्ध वकील अलीम पठाण सर यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय नगरसेवक संजय ( आण्णा ) सावंत, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन चे मार्गदर्शक समीर भाई शेख, शालेय शिक्षण समिती चे उपाध्यक्ष इकबाल भाई शेख ,सकल मुस्लीम समाज करमाळा चे अध्यक्ष जमीर भाई सय्यद, आझाद भाई शेख उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट, रमजान भाई बेग (सचिव एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशन), सुरज भाई शेख (सचिव रहनुमा ट्रस्ट) , उद्योजक जावेद आतार यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी मनोगत व्यक्त करताना मुजावर सर यांनी सांगितले की मुस्लीम समाजातील शिक्षणाचे प्रमाण कमी आहे . समाजातील शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी पालकांनी, विद्यार्थ्यांनी व शिक्षक वर्गाने शिक्षणाप्रती जागरूक राहून मुलांन मध्ये शिक्षण घेण्यासाठी रुची दाखविणे गरजेचे आहे. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता पुढील पिढी घडविण्यासाठी शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वेळ प्रसंगी एखादा विद्यार्थी अभ्यासात हुशार आहे परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी त्या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी त्या विद्यार्थ्यांनांचे आर्थिक भार आम्ही सर्व जण उचलायला तयार आहे परंतु त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही त्यांचे शिक्षण थांबु देणार नाही असे सांगितले आहे.
अॅड अलीम पठाण यांनी सांगितले की आज आम्ही तुमच्या समोर वकील म्हणून उभा आहे ते फक्त शिक्षणामुळे शक्य झाले आहे. दहावी नंतर तुम्ही जेव्हा उच्च शिक्षण घेण्यासाठी जाताल त्यावेळी तुमच्या कडे शिक्षण घेण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहे त्यापैकी एका विभागाची निवड करुन त्यामध्ये उच्च स्थान कसे मिळेल या कडे लक्ष देण्याची गरज आहे.
करमाळ्यातील बागवान हाॅस्पीटल चे प्रमुख डॉ समीर बागवान यांनी सांगितले की आमच्या आई - वडिलांनी आमच्या शिक्षणाकडे लक्ष दिल्यामुळे आज मी डॉक्टर झालोच परंतु माझ्या बरोबर माझे मोठे बंधू, माझी पत्नी असे मिळून आमच्या बागवान कुटुंबातील बारा लोक आज डॉक्टर आहेत. आमची सर्वांची आर्थिक प्रगती व समाजातील मान हे शिक्षणामुळेच मिळाला आहे यासाठी मी समाजातील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एकच सांगतो की तुम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही त्याची पहिली पायरी आहे .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिशान भाई कबीर( युवक नेते) अलीम भाई पठाण( उपाध्यक्ष सकल मुस्लीम समाज करमाळा) शाहीद भाई बेग ( युवक नेते सकल मुस्लीम करमाला ),आरबाज भाई बेग ( युवक नेते सकल मुस्लिम समाज करमाला) कलीम भाई शेख (सामाजिक कार्यकर्ते)व उर्दू शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित होता.