By : Polticalface Team ,11-08-2024
श्रीगोंदा –“भारतीय सण हे नाती दृढ करणारे सण आहेत. गेल्या काही वर्षांपासून या सणांना सामाजिकतेची जोड मिळत आहे. समाजाच्या या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करून देण्यासाठी व त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, म्हणून चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त श्रीगोंदा येथील महादजी शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या स्काऊट विभागाच्या रेंजर पथकातील बहिणींनी देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांना आपल्या खाऊच्या पैशातून राख्या पाठविल्या. देशाचे रक्षण करणाऱ्या या बांधवांना त्या राख्यांबरोबर बंधू तुझे सलाम, धागा बंधन का, राखी बहन की असे अनोखे संदेशही पाठविण्यात आले आहेत. देशाच्या सीमेवर अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे संरक्षण करण्यात सैनिक बांधवांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना कधीही सणासुदीचा आनंद घेता येत नसतो. या राखीपौर्णिमला या छोट्याशा गावातील बहिणींनी सीमेवरील बांधवांसाठी आपल्या खाऊच्या पैशातून सुमारे १५०० राख्या नुकत्याच पाठविण्यात आल्या. त्यांना प्राचार्य दिलीप भूजबळ, पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमामुळे जवानांचे मनोधैर्य नक्कीच उंचावेल. राष्ट्रीय भावनेतून हा कार्यक्रम केला जातो. विद्यार्थ्यांच्यामध्ये जवानांच्या आत्मियता निर्माण होऊन या विद्यार्थ्यांतून उद्याचे राष्ट्रभक्त नागरिक तयार होतील." बहीर्णीच्या या राखीच्या धाग्याने हजारो सैनिकांना आमच्या रक्षणासाठी सिमेवर लढताना प्रेरणा मिळणार असल्याची भावना तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी व्यक्त केली.
भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधल्यावर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिक मात्र प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र पहारा देतात. सीमेवरील या हजारो सैनिकांना भाऊ मानणाऱ्या श्रीगोंद्याच्या बहिणींनी १५०० राख्या व ५० शुभेच्छा संदेश सीमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याबद्दल नायब तहसीलदार यांनी रेंजर पथकाचे कौतुक केले.या उपक्रमचे नियोजन स्काऊट मास्टर श्री. विकास लोखंडे यांनी केले आहे.
या कार्यक्रमावेळी स्काऊट मास्टर सचिन झगडे, लक्ष्मीकांत खेडकर, संजय मादेवार, चंद्रकला दरेकर,साहेबराव मांडे,ईश्वर नवगिरे,समीर भिसे,संतोष मगर,दत्तात्रय तवले उपस्थित होते.