15 ऑगस्ट : स्वतंत्रता दिवस निमंत्रण, उपमुख्यमंत्री ना.मा.श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सैनिक संवाद व सन्मान सोहळा

By : Polticalface Team ,13-08-2024

15 ऑगस्ट : स्वतंत्रता दिवस निमंत्रण,  उपमुख्यमंत्री ना.मा.श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सैनिक संवाद व सन्मान सोहळा

पुणे प्रतिनिधी : भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन तसेच "कारगिल विजय दिनाला" 25 वर्षे पूर्ण झाल्याने "रौप्य महोत्सवी सोहळा" गुरुवार, दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता सन्माननीय उपमुख्यमंत्री ना.मा.श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत लोहगाव, पुणे येथील "गजानन सभागृहात तिरंगा ध्वजारोहण करून तसेच कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर सैनिकांना मानवंदना देऊन...अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून" साजरा करण्यात येणार आहे. 

         याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार मा.श्री. सुनीलजी तटकरे साहेब, महिला व बाल विकास मंत्री ना. अदितीताई तटकरे, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रुपालीताई चाकणकर, आमदार मा.श्री. सुनील आण्णा टिंगरे, आमदार मा.श्री. शिवाजीराव गर्जे,आदींसह अन्य मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. यावेळी कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या वीर माता, वीर-पत्नी तसेच कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या शुरुवीर विद्यमान सैनिकांसह माजी सैनिकांचा सन्मान राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते होणार आहे.

                   तरी आपण सर्वांनी कार्यक्रमास सह-परीवार उपस्थित राहून राष्ट्रीय कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन माजीसैनिक लीडर, राष्ट्रवादी नेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा. दिपकराजे शिर्के यांनी केले आहे.🇮🇳

 

#टिप:- कार्यक्रमा दरम्यान मा. अजितदादा हे वीर-माता पिता, वीर-पत्नी व माजी सैनिकांच्या विविध प्रश्नावर प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत..! 

#ड्रेस_कोड :- माजी सैनिकांनी काळी पँट, काळा शुज, पांढरा शर्ट, जॅकेट किंवा ब्लेझर, मेडल्स व कॅप असा ड्रेस कोड परिधान करावा. 

#स्थळ :- गजानन मंगल कार्यालय, लोहगाव,पुणे

#टीप : कार्यक्रमानंतर अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले आहे.

#संपर्क : 7066667546, 8600154625, 9404379379

#स्थळ_लोकेशन_लिंक:-

https://maps.app.goo.gl/7ST8FZ2P3Lm1Fq1g6

प्रकाश म्हस्के
संपादक

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन