By : Polticalface Team ,13-09-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुका पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या संघाला प्रथम क्रमांक मिळाला. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा काष्टी येथील परिक्रमा संकलनामध्ये आयोजित करण्यात आले आहेत. याप्रसंगी श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या संघाने देवदैठण संघावर मात करत प्रथम क्रमांक मिळवला. व्यंकनाथ विद्यालयाच्या संघाचे खेळाडू हर्षद भागवत; राजवीर घाडगे; सार्थक पालवे; शुभम वडवकर; रेहान इनामदार; कृष्णा गिरे; ओबलेस जगताप; संग्राम कुदांडे; सचिन आमले आदी संघाच्या खेळाडूंनी या कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक तुषार नागवडे संतोष शिंदे यांनी भरीव असे मार्गदर्शन केले होते. या यशस्वी खेळाडूंचे नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; जिल्हा बँकेच्या संचलिका सौ अनुराधाताई नागवडे; नागवडे कारखान्याचे संचालक व स्कूल कमिटीचे अध्यक्ष डी आर काकडे; स्कूल कमिटीचे सर्व सदस्य; प्राचार्य पुराने ए एल आदींनी अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :