By : Polticalface Team ,13-09-2024
मुंबई : कोणी बीग बॉस बघत असेल त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगावी वाटते की, ही निक्की तांबोळी हिंदी बीग बॉस खेळून आलेली आहे.
ती टॉप 3 मध्ये होती.
बीग बॉसला अशा एका माणसाची गरज असते.
बीग बॉस संपूर्ण फिक्स नसलं तरीही बऱ्याच गोष्टी फिक्स करता येतात.
उदाहरणार्थ निक्की.
ती बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती आहे.
कदाचित अरबाज आणि जान्हवीही त्यापैकी असावेत.
कारण हे नसतील तर भांडणं होणार नाहीत आणि प्रेक्षक शो पाहणार नाहीत.
2-3 लोकांना एक स्पेसिफिक रोल दिलेला असतो.
त्यांना त्या रोलमध्येच रहावं लागतं.
यासाठी दर आठवड्याला यांचा पगार जमा होत राहतो.
या लोकांना काढलं तर बाकी लोक तिथे सत्संग सुरू करतील, इतकी ती सज्जन मंडळी आहे.
किंवा त्यांची इमेज ती आहे.
अशा लोकांना पाहायला कोण TV समोर बसेल?
लोकांना सध्या मसाला हवा आहे.
निक्की तो मसाला पुरेपूर पुरवत आहे.
ती अरबाज निक्कीची लवस्टोरीही फेक आहे.
दर सिजनमध्ये एक लव स्टोरी असते आणि बाहेर त्यांची स्टोरी कधीच पुढे जाताना दिसलेली नाही.
निक्कीची जिरवण्यासाठी स्क्रीप्टप्रमाणे राखी सावंतची घरात एंट्री होणं अपेक्षित होतं पण दुसरीच वाईल्ड कार्ड एंट्री होताना दिसतेय.
गंमत म्हणून बीग बॉस पाहा.
जास्त त्यात घुसायची गरज नाही.
सुरज, डीपी किंवा पॅडी दावेदार राहतील.
सुरज जिंकला पाहिजे पण नाही जिंकला तरीही त्याला बक्कळ पैसा मिळणार आहे.
कारण तो बीग बॉस या शो ला लागलेली लॉटरी आहे!
Sq Rq Zq बुक्कीत टेंगूळ.
वड पाच्ची खवून!!!!!