श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.
By : Polticalface Team ,13-09-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १३ सप्टेंबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व कॅनॉल ग्रुप मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेश फेस्टिवल या सांस्कृतिक कार्यक्रमाचे. यवत रेल्वे स्टेशन ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी गुरुवार दि १३ सप्टेंबर रोजी प्रथमच आयोजन करण्यात आले होते.
लय भारी महाहोम मिनिस्टर या कार्यक्रमाचे सौजन्य शागिरभाई मुनीर शेख. व श्री शिवाजीबापू दत्तात्रय दोरगे तसेच सौ कांचन राहुल कुल यांच्या हस्ते नारळ फोडून
खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी हभप नानासाहेब दोरगे महाराज हभप दिपक मोटे महाराज. यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सुभाष बांपु यादव. सदस्य राजेंद्र जगताप. सदस्य सुभाष यादव. आदी मान्यवर उपस्थित होते
श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व कॅनॉल ग्रुप मित्र मंडळा च्या आयोजित श्री गणेश उत्सव फेस्टिवल या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून सौ कांचन कुल यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली होती. मंडळाच्या वतीने ह भ प नानासाहेब दोरगे महाराज यांच्या हस्ते. सौ कांचन कुल. यांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देण्यात आली.
या प्रसंगी बोलताना कांचन कुल म्हणाल्या लय भारी महाहोम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा या कार्यक्रमात उपस्थित महिलांनी सहभाग घ्यावा आणि पैठणी मिळवण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला उपस्थित महिलांना दिला तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या दौंड तालुक्यातील विकासात्मक कामांबाबत दादांनी बेबी कॅनॉलच्या कामासाठी आवश्यक निधी मंजूर केला आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना लाभ मिळत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सरकार सत्तेवर आलं तर दौंड तालुक्यातील विकासात्मक कामे गतीने होतील असे आश्वासन त्यांनी. लय भारी महाहोम मिनिस्टर या कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना दिले
लय भारी महाहोम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा या कार्यक्रमातील प्रथम क्रमांकाची पैठणीचे मानकरी सौ कोमल सोमनाथ खरात. यानी मिळाली असुन सौ दिपाली वेताळ सौ फडतरे मॅडम सौ सोनाली यादव.या तीन महिला पैठणीचे मानकरी ठरल्या आहेत. लय भारी महाहोम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा महाराष्ट्राचे लाडके भाऊजी प्राचार्य तेजस टेंगले यांनी अतिशय सुंदर व उत्कृष्ट प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या प्रसंगी उपस्थित यवत पंचक्रोशीतील सर्व महिलांना श्री विठ्ठल रुक्मिणी च्या सुंदर मूर्ती देण्यात आली.
शुक्रवार दि १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता सायली पाटील भारदार लावण्याचा जंगी कार्यक्रम होणारा असून शनिवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भारुडकार झी टॉकीज फेम ह भ प चंदाताई तिवारी पंढरपूर तसेच रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता जगप्रसिद्ध जादूगर ईश्वर जादूच्या प्रयोगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यवत पंचक्रोशीतील गणेश भक्तांनी व सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आव्हान श्री हनुमान मित्र मंडळ व कॅनॉल मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
या प्रसंगी कॅनाॅल ग्रुप मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र जगताप (मा. ग्रा. सदस्य यवत) उपाध्यक्ष..श्री संतोष मुळीक
श्री हनुमान तरुन मंडळ अध्यक्ष..हभप नानासो दोरगे महाराज
उपाध्यक्ष..श्री नामदेव घिगे प्रामुख्याने उपस्थित होते यवत पंचक्रोशीतील गणेश उत्सवाच्या निमित्ताने श्री गणेश फेस्टिवल या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.