By : Polticalface Team ,14-09-2024
श्रीगोंदा :
तालुक्यातील मढेवडगाव येथील शिवशक्ती युवा प्रतिष्ठानच्या वतीने सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या लय भारी होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये सौ. राणीताई संभाजी बनकर यांनी महिलांच्या स्पर्धेमध्ये झालेल्या लढतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवून होम मिनिस्टर होण्याचा मान मिळवला
मढेवडगाव येथील शिवशक्ती युवा प्रतिष्ठानच्या वतीने सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निमित्ताने दररोज वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन केलेलं असून काल प्रा. शंकरराव गवते प्रस्तुत लय भारी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं होतं सदर कार्यक्रमांमध्ये 200 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला खरंतर ग्रामीण भागातील महिलांना एक वेगळं व्यासपीठ उपस्थित करून देण्याच्या दृष्टिकोनातून शिवशक्ती युवा प्रतिष्ठानच्या वतीने घेतलेला हा कार्यक्रम गावातील सर्वच महिलांच्या साठी एक आदर्शवत उपक्रम ठरला म्हणून गावातील अनेक महिलांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती नोंदवली त्यामध्ये अनेक पारंपारिक खेळाबरोबरच गाण्याच्या भेंड्या, संगीत खुर्ची, उखाणे, दोरी उड्या, असे विविध खेळ महिलांसाठी घेण्यात आले त्यामध्ये वयोवृद्ध महिलांसाठी वेगवेगळे खेळ - खेळून त्यामधून 5 विजेता महिलांना हॉटेल प्रणिता यांच्यावतीने पैठणी साडी व हॉटेल राजवर्धन यांच्या वतीने सहकुटुंब सहपरिवार जेवणाचे मोफत पास उपलब्ध करून दिले त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी मोफत व्हिडिओ व फोटोग्राफ तसेच प्रमोद वाबळे यांच्या वतीने साऊंड सिस्टिम व लाईट व्यवस्था उपलब्ध करून दिले याचे आयोजन शिवशक्ती युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले
त्यामध्ये प्रथम क्रमांक सौ.राणी संभाजी बनकर, द्वितीय क्रमांक सौ.मनीषा लक्ष्मण गाडे, तृतीय क्रमांक सौ.शुभांगी अंबादास मांडे, चतुर्थ क्रमांक सौ.सोनाली प्रमोद बनकर, आणि पाचवा क्रमांक आजीबाई सौ.अनिता अशोक शिंदे यांनी मिळवला.
दहीहंडी कार्यक्रमाच्या प्रथम विजेत्या सौ.वर्षा वाबळे, सौ.नंदा झिटे
रिंग बॉल स्पर्धेमध्ये सौ.वनिता वाबळे, सौ.संगीता जाधव यांनी ही बक्षिसे जिंकली
या ठिकाणी कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे, जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, सरपंच प्रमोद शिंदे, चेअरमन प्रकाश उंडे, यांच्यासह मंडळाचे सर्व आजी- माजी अध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट: शिवशक्ती युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 30 वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यावर्षी मंडळाच्या सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील महिला व लहान मुलांना एक वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दररोज सायंकाळी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यासाठी गावातील महिला व ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळतो याचा सर्वांनाच मोठा आनंद आहे
भानुदास वाबळे,
( जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी मराठा संघटना अहिल्यानगर)
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
केडगाव पाटबंधारे शाखेत सावळा गोंधळ. निवासी शाखा अधिकारी कर्मचारी मिळतील का ? वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ?
केडगाव स्टेशन (बोरीपार्थी) पाटबंधारे वसाहत सार्वजनिक श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीदत्त पालखी मिरवणूक. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न