By : Polticalface Team ,14-09-2024
श्रीगोंदा - शालेय उपक्रमांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अधिक सहभागी करून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी शाळा सुंदर शाळा टप्पा – २ ही मोहीम सुरू केली.या निमित्ताने येथील रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा जिल्हास्तरीय परीक्षण संपन्न झाले.
या परीक्षणात विद्यालयातील विविध उपक्रमांची पाहणी करण्यात आली.यात विद्यालयातील पायाभूत सुविधा शासन ध्येयधोरण अंमलबजावणी व शैक्षणिक संपादणूक अशा तीन भागात मुल्यांकन करण्यात आले. यामध्ये आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन, स्वच्छता विषयक स्थिती, सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन, आधार वैधता, सरल प्रणाली उपयोग, माहिती अद्ययावतीकरण, युडायस प्रणाली वरील नोंदी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र सहभाग, महावाचन चळवळ, मागील वर्षी या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या शपथ/गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मधील सहभाग अनुपालन, शासकीय कार्यक्रमातील सहभाग (उदा. मेरा देश मेरी माटी, ग्रंथालयांचा उपयोग, पाठयपुस्तक,विद्यार्थी मूल्यमापन चाचणी, आयोजन, स्त्री-पुरुष समानता, मतदान प्रचार प्रसार, विविध महत्वपूर्ण विषयांच्या शपथ कार्यक्रम, गणवेश वाटप, तंबाखुमुक्त भारत, कुष्ठरोग निर्मुलन, आनंददायी शनिवार, व्यवहारज्ञान, कृषीघटक इ.) यासह विविध शासकीय शिष्यवृत्ती,सवलती, योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी केलेले प्रयत्न, मतदान प्रचार प्रसार,निवडणूक साक्षरता मंच व स्काऊट गाईड उपक्रम इ अशा विविध उपक्रमांची तपासणी करण्यात आली.
ही तपासणी करण्यासाठी पथक प्रमुख म्हणून आकाश दरेकर (उपशिक्षणाधिकारी-माध्य.) यांनी काम पहिले, तर प्रदीप शिंदे ( गटशिक्षणाधिकारी-कर्जत), एन.के.कुलट ( विस्तार अधिकारी –मुख्यालय ), विनेश लाळगे ( विस्तार अधिकारी – पारनेर) पथक सदस्य म्हणून काम पहिले.
सकाळी शालेय प्रार्थनेपासून ते दु.३ वाजेपर्यंत त्यांनी विद्यालयाच्या सर्वच घटकांची बारकाईने तपासणी करून मुल्यांकन केले. या पथकातील सर्व मान्यवरांचे बाबासाहेब भोस (मा.मँनेजिंग कौन्सिल सदस्य,r.शि.सं. सातारा) यांनी परीक्षणानंतर पुस्तक भेट देऊन आभार मानले. पथक प्रमुख म्हणून आकाश दरेकर यांचे हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे, विज्ञान शिक्षक विलास दरेकर, गुरुकुल प्रमुख विलास लबडे, गुणवत्ता कक्ष प्रमुख सुधीर साबळे,कलाशिक्षक संतोष शिंदे व कल्याण उल्हारे, विद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर सेवक यांनी सर्व शालेय उपक्रमाची माहिती देण्यासाठी प्रभावी सहकार्य केले.
वाचक क्रमांक :