By : Polticalface Team ,15-09-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १५ सप्टेंबर २०२४ दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व डीजे चालक-मालक संघटना यांची दौंड पोलीस निरीक्षक श्री संतोष डोके यांनी पोलीस स्टेशन येथे मीटिंग घेऊन सर्व डिजे चालक मालकांना नोटीस देऊन इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी सो पुणे यांनी पुणे जिल्हा ग्रामीण भागात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे 163 अन्वये गणपति विसर्जन मिरवणुकीमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने. सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक दरम्यान शासनाने दिलेल्या नियमा प्रमाणे वेळेचे व डेसिबल मर्यादाचे पालन सर्वांनी करावे.
दिनांक 15 /09 /2024 ते 17/ 09 /2024 गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये लेझर लाईट चा वापर करण्यास निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या बाबत च्या आदेशाची प्रत तसेच बी.एन.एस.168 प्रमाणे सर्वांना नोटीस देण्यात आली असून. वरील सर्व सूचनांचे पालन न केल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्या बाबत सर्व डीजे चालक-मालकांना सूचना दिल्या आहेत या वेळी दौंड शहर व ग्रामीण भागातील एकुण 26 डीजे चालक-मालक उपस्थित होते*
चौकट
जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व संरक्षणार्थ शासनाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात असून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र सार्वजनिक गणेश उत्सव विसर्जन मिरवणूक दरम्यान डिजे बाबत घेतलेल्या निर्णयाचे व नियमांचे पालन होईल का ? या बाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक कालावधी मध्ये देशी विदेशी दारू नागरिकांना मिळते कशी या बाबत प्रश्न उपस्थित केला जात असुन. पोलीस प्रशासनाने
देशी विदेशी सरकार मान्य देशी दारू. बियर बार. बियर वाईन शॉप. हातभट्टी चालक मालकांना व हॉटेल व्यवसायिकांनवर कायदेशीर कारवाई होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाचक क्रमांक :