By : Polticalface Team ,15-09-2024
श्रीगोंदा: तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि उपाध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभारणीसाठी वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पदावर नेमणुका देण्यात येत आहेत. त्यानुसार घोडेगाव येथील सौ. रेखाताई मनोहर मोरे यांची श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बंडू तात्या जगताप आणि अहमदनगर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. अनुराधाताई नागवडे यांच्या हस्ते या निवडीचे पत्र सौ. मोरे यांना देण्यात आले.
या निवडीबद्दल नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, व्हा .चेअरमन बाबासाहेब भोस, संचालक मंडळ सदस्य, तसेच तात्यासाहेब घोडके आदी मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. सदर नियुक्तीची पत्र देत असताना मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
वाचक क्रमांक :