महाराजा जिवाजीराव शिंदे विद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विविध उपक्रम
By : Polticalface Team ,05-10-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात आली. दि.17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर पर्यंत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजची तरुण पिढी मोबाईलच्या दुनियेत हरवलेली आहे त्यांच्यामध्ये संस्कार स्वच्छता स्वभाव स्वच्छता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून सर्व स्वयंसेवकांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्वच्छतेचे कामे करून समाजाला एक स्वच्छतेचा संदेश दिला. श्रीगोंदा शहरातून स्वच्छता रॅली आयोजित करण्यात आली होती . रॅलीमध्ये महाविद्यालयातील अधिक संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील परिसर स्वच्छता ,रांगोळी स्पर्धा आदी उपक्रम घेण्यात आले स्वच्छतेचे महत्व लोकांना पटवून देण्यासाठी शहरांमध्ये पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच एस.टी स्टँड भाजी मंडई , सरस्वती नदीकाठ, नदीकाठावरील तात्या महाराज मंदिर, दत्त मंदिर आदी परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्रामुख्याने एकेरी वापर केलेल्या प्लास्टिकचे संकलन करण्यात आले व नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याची विल्हेवाट लावण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. एम. आर .जरे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले तसेच उपप्राचार्य डॉ. पी एन प्रा. भुजबळ एस एम प्रा. अहिवळे एस बी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छते संबंधी मोलाचे मार्गदर्शन केले. या उपक्रमामध्ये महाविद्यालयीन सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवकांनी सहभाग नोंदविला. मोहिमेमधील विविध उपक्रम राबवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. बुलाखे बी ए . प्रा. बहिरम डी एम, प्रा. ताटे ए.बी प्रा. पवार मॅडम प्रा. जाधव मॅडम प्रा. म्हस्के मॅडम प्रा. रायकर मॅडम प्रा. शितोळे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य केले.
वाचक क्रमांक :