दौंड (प्रतिनिधी) अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळे, फुले व भाजीपाला पिकतो. परंतु किसान रेल बंद आहेत व प्रवाशी जलद रेल्वे गाड्यांमध्ये अपुरी जागा असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नुकसान टाळण्यासाठी या मार्गावर किसान रेल सुरू करावी या मागणीसाठी स्वतंत्र भारत पक्ष, जन संसद संघटना व पीपल्स हेल्पलाईन या सामाजिक संघटना ०७ ऑक्टबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
शेतकऱ्यांचा नाशिवंत शेतीमाल लवकरात लवकर व कमी खर्चात देशातील इतर बाजार पेठेत पोहोचवता यावा म्हणून केंद्र शासनाने अनेक किसान रेल सुरू केल्या होत्या. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होता होता. मात्र सरकारने बऱ्याच किसान रेल बंद केल्या आहेत. महाराष्ट्रातून उत्तर भारतात व पूर्वेकडच्या राज्यांमध्ये जाणाऱ्या जलद प्रवासी गाड्यांमध्ये फक्त आर्धा डबा (बोगी) पार्सल साठी असतो. मोठ्या शहरातून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये आगोदरच औद्योगिक कारखान्यांचा स्टील, लोखंडाचा माल, गाड्यांचे सुटे भाग भरले जातात. पुढील स्टेशनवर येणारा शेतमाल चढविण्यासाठी जागा रहात नाही. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा माल पाठवला जात नाही व खराब होऊन जातो.
पार्सलच्या डब्यात जागा कमी आल्यामुळे माल चाढवणारे ठेकेदार, प्राधान्य देण्यासाठी शेतकऱ्यांकडून अव्वाचे सव्वा हमाली वसूल करतात.
रेल्वे मंत्रालयाने बंद केलेल्या किसान रेल सुरू कराव्यात, गरज असेल तेथे नवीन किसान रेल सुरू कराव्यात. जेथे किसान रेलची सुविधा नाही तेथे प्रत्येक जलद प्रवासी गाडीला एक स्वतंत्र बोगी फक्त शेतीमालासाठी जोडण्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी सोमवार दिनांक ७ ऑक्टबर रोजी सकाळी ११.०० वाजे पासून सायं ४.०० वाजे पर्यंत जिल्हाधिकारी अहमदनगर कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करणार आहोत. या आंदोलनास शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आंदोलनाच्या नेत्यांनी केले आहे. हे आंदोलन शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे नेते अनिल घनवट, भारतीय जन संसदेचे नेते अशोक सब्बान व पीपल्स हेल्पलाईनचे नेते ऍड. कारभारी गवळी यांच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
विधानसभेला संधी द्या श्रीगोंदा तालुक्याचे नंदनवन करू महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे
विधानसभेला संधी द्या श्रीगोंदा तालुक्याचे नंदनवन करू महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे
सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष जिजाबापू शिंदे काळाच्या पडद्याआड,हजारोंच्या उपस्थितीत कै जिजाबापू शिंदेंना भावपूर्ण श्रद्धांजली
पवार साहेबांच्या बाजूला जो उभा तोच आमचा दादा; बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
विधानसभा निवडणुकीत सौ अनुराधाताई नागवडे ह्या मताधिक्याचीं मोठी हॅट्रेटिक करणार , तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठाम विश्वास
श्री काळभैरवनाथांना साक्षी ठेवून सांगतो. राहुल दादांच्या विजया मध्ये. यवत गावच्या मतांचा सर्वात जास्त वाटा असेल. उपसरपंच सुभाष यादव.
सौ अनुराधाताई नागवडे यांच्या निमगाव खलू येथील जन आशीर्वाद यात्रेस उदंड प्रतिसाद
श्रीगोद्यातून भा.ज.पा.युवा मोर्चाचे उपअध्यक्ष विक्रम पाचपुते यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत
एसटी चालकाचे नियंत्रण सुटले; इंदापूरात भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी
घर फोडणे माझा स्वभाव नाही; शरद पवारांनी बारामतीत सभा गाजवली
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अट्टल घरफोडी दरोडा गुन्ह्यातील फरारी आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
श्रीगोंद्याच्या लोकप्रतिनिधीकडून 40 वर्षे केवळ घोषणा आणि गलथान कारभार, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांचा आरोप
श्रीगोंदा विधानसभेसाठी भाजपाच्या सौ. प्रतिभा बबनराव पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल
अनुराधा नागवडे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला तर धनशाम शेलार यांनी साधेपणाणे उमेदवारी अर्ज दाखल केले
भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार अँड राहुल कुल. गोपीचंद पडळकर. योगेश टिळेकर. रिपाइंचे परशुराम वाडेकर यांच्या उपस्थितीत दौंड विधानसभेचा अर्ज भरणार.
श्रीगोंद्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधा ताई नागवडे यांचे मोठे शक्ती प्रदर्शनाद्वारे उमेदवारी दाखल
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचा. राज्य टीडीएफ पंचवार्षिक निवडणुकीत दणदणीत विजय. अध्यक्षपदी जी.के.थोरात. व कार्यवाहपदी के.एस.ढोमसे यांची प्रचंड बहुमताने निवड.
श्रीगोंद्यात नागवडे विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांची तोफ कडाडली
संगमनेर येथील घटनेबाबत श्रीगोंदा काँगेसच्या वतीने निषेध
लोकसभेला चांगले काम केले ;आता विधानसभेलाही चांगले काम करावे - निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत