By : Polticalface Team ,07-10-2024
मुंबई जनआधार न्युज भिमसेन जाधव
मो .9112131616- बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेच्या प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली असून बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले नुकताच सुरू झाला आहे. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेच्या सुरुवातीला रितेश देशमुख पुन्हा एकदा धमाकेदार परफॉर्मन्ससह परतला. ग्रँड फिनालेचा हटके माहोल तयार करण्यासाठी बिग बॉसचे टॉप ६ सदस्य आणि एक्स-सदस्य यांच्या हटके परफॉर्मन्सने कार्यक्रमाला रंगत आणली. अभिजीत आणि सूरजमध्ये तगडी स्पर्धा रंगली असून त्यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सने आग लावून टाकली. पहिल्या एलिमिनेशनमध्ये जान्हवी किल्लेकर तर दुसऱ्या आणि तिसऱ्या एलिमिनेशनमध्ये अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार एलिमिनेट झाले.
ट्रॉफीवरही बारामतीचच वर्चस्व;
सूरज चव्हाणनं जिंकला सिझन : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा गुलिगत सूरज चव्हाण विजेता ठरला आहे.
मुंबई - बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेच्या प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली असून बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले नुकताच सुरू झाला आहे. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेच्या सुरुवातीला रितेश देशमुख पुन्हा एकदा धमाकेदार परफॉर्मन्ससह परतला. ग्रँड फिनालेचा हटके माहोल तयार करण्यासाठी बिग बॉसचे टॉप ६ सदस्य आणि एक्स-सदस्य यांच्या हटके परफॉर्मन्सने कार्यक्रमाला रंगत आणली. अभिजीत आणि सूरजमध्ये तगडी स्पर्धा रंगली असून त्यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सने आग लावून टाकली. पहिल्या एलिमिनेशनमध्ये जान्हवी किल्लेकर तर दुसऱ्या आणि तिसऱ्या एलिमिनेशनमध्ये अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार एलिमिनेट झाले.
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर योगिताच्या भेटीसाठी पोहोचली आर्या
ज्याची सगळे आतुरतेने वाट बघत होते तो क्षण जवळ आला अन् नेटकऱ्यांनी लावलेला अंदाज खरा ठरला असून स्वतःच्या साध्या आणि खऱ्या स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी जिंकली असून तो या पर्वाचा विजेता झाला आहे. स्वतःवर असलेला विश्वास, त्याचबरोबर आई मरी माता आणि फॅन्सवरचा असलेला सूरज चव्हाणचा विश्वास खरा ठरला आहे. घर सोडून जायची इच्छा नाही, माझ्या घरावर तुमचं नाव असेल आणि काळजावर पण असं सूरज घरातून बाहेर निघताना म्हणाला.
सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता झाल्यामुळे अभिजीत सावंत उपविजेता ठरला आहे.
वाचक क्रमांक :