करमाळा मतदारसंघातील रस्ते वीज पाणी याबरोबर शिक्षण आरोग्य रोजगार निर्मिती करून रिधोरे गावासह छत्तीस गावाचा सर्वांगीण विकास करू- प्राध्यापक रामदास झोळ सर
By : Polticalface Team ,07-10-2024
करमाळा प्रतिनिधी
करमाळा माढा मतदारसंघातील रस्ते वीज पाणी याचबरोबर शिक्षण आरोग्य रोजगार निर्मिती करून रिधोरे गावासह छत्तीस गावाचा सर्वांगीण विकास करू असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष करमाळा माढा मतदारसंघाची उमेदवार प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना माढा यांच्यावतीने सहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता भव्य जनसंवाद यात्रा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बहुजन शेतकरी कामगार संघर्ष सेनेचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे होते.प्रमुख उपस्थिती म्हणून व्यासपीठावर प्राध्यापक रामदास झोळ सर यांचे वडील मधुकर झोळ बंधू अनुरथ झोळ पांडुरंग झोळ सासरे लालासाहेब जगताप,दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव सौ.मायाताई झोळमॅडम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील,तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, जिल्हा नेते गणेश मंगवडे, तालुका उपाध्यक्ष बापू गायकवाड सुहास काळे पाटील,संजय जगताप सर वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ मंगवडे,गफूर शेख श्रीकांत साखरे पाटील उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक रामदास झोळ सर म्हणाले की रस्ते वीज पाणी ही कामे लोकप्रतिनिधीला करावीच लागतात परंतु याचबरोबर शिक्षण आरोग्य रोजगार ही प्रश्न मार्गी लावणे लोकप्रतिनिधीचे काम असते विदोरी गावांमधील रस्ते पाण्याबाबत प्रश्न वर्षानुवर्ष तसाच आहे तो प्रश्न मार्गी लावणार आहे तसेच शिक्षण व रोजगार निर्मितीसाठी कुर्डूवाडी शहरामध्ये जागा मिळाल्यास शिक्षण संकुलाची निर्मिती करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करणार आहे. याचबरोबर रोजगार निर्मितीसाठी भव्य नोकरी महोत्सवाच्या आयोजन करून युवकांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. करमाळा तालुक्यात मध्ये सर्वात जास्त निधी दिला असे विद्यमान आमदार म्हणत आहेत आणि इकडे 36 गावांमध्ये आल्यानंतर येथे सर्वाधिक निधी दिला अशी सांगत आहेत. परंतु सगळीकडे रस्ते पाणी वीज आरोग्याबाबत प्रश्न तसेच आहेत मग निधी गेला कुठे हा हा प्रश्न जनतेने विचारणे गरजेचे आहे.करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळून देण्याबरोबरच मकाई कमलाई भैरवनाथ या कारखान्याकडे अडकलेली तीस कोटीची बिले आंदोलन करून आम्ही मिळवून दिली आहेत. शेतकऱ्यांच्या खिशाला एक रुपयाची झळ न लागू स्वतः न्यायालयीन लढून न्याय मिळून दिला आहे. आपल्या भागातील विठ्ठल शुगर्स कारखाना दुसऱ्या कंपनीला चालण्यास दिला असून या कारखान्याकडे अडकलेली बिल सभासद रक्कम मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करून 70 कोटी रुपये त्यांना देण्यास भाग पाडले असून त्याची प्रक्रिया चालू असल्याची त्यांनी सांगितले.मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सर्व घटकांना बहुजन बांधवांना न्याय देण्यासाठी आपण पाठपुरावा करून मुलींचे शिक्षण मोफत करण्याबरोबरच ओबीसी विद्यार्थ्यांनाही इतर समाजाप्रमाणे वस्तीगृह भत्ता मिळून दिला आहे. धनगर समाजालाही एसटी आरक्षणाप्रमाणे सर्व लाभ मिळण्यासाठी जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मागणी केली तोही शासन निर्णय झाला आहे . जरांगे पाटील हे सर्व समाजाचे कल्याण करणारे नेत्या असल्यामुळे त्यांचे कासर्वसामावेशक आहे.त्यामुळे आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे .करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना उजनीचे पाणी मिळण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असून कालवा समितीमध्ये शासनाचे अधिकृत नियंत्रण असण्यासाठी आपण आग्रही आहोत.आपल्या हक्काचे पाणी आपणास मिळाले पाहिजे याकरिता समांतर जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले कुर्डूवाडी शहरामध्ये व्यावसायिक शिक्षणाची सोय करून एमआयडीसी उद्योग व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्न करून स्वयंरोजगार मिळून देणार असल्याने कुर्डूवाडी शहर व छत्तीस गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मला एक वेळ आमदार म्हणून निवडून देऊनआपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी केले आहे. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी प्रा. रामदास झोळ सर यांचे काम नक्कीच प्रेरणादायी असल्याने आम्ही कुर्डूवाडी 36 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना पाठिंबा दिला असून जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांची उमेदवारी जाहीर करत आहे. एक सुशिक्षित अभ्यासू सुसंस्कत नेतृत्वाची विकास साठी गरज असल्याने रिधोरे गावा सह छत्तीस गावामधून त्यांना मताधिक्य मिळून घेऊन निवडून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटना रिधोरे गाव नेहमीच प्रस्थापितच्या विरोधात उभा राहुन परिवर्तनाचे काम केले आहे.त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदारांना धक्का देऊन झोळ सरांना निवडून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे म्हणाले की एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सुपुत्राने कुठल्याही नेते मंडळीचे सहकार्य न घेता भिगवणसारख्या ठिकाणी उजाड माळरानावर पाच हजार विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय करण्यासाठी मोठे शैक्षणिक संकुल उभे केले आहे .विकासाचा दृष्टिकोन असलेले उच्चशिक्षित ,सुसंस्कृत अभ्यासू प्रामाणिक सामाजिक भान असलेले हे नेतृत्व असून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळून घेण्यासाठी शिक्षण रोजगार आरोग्य याचबरोबर कुर्डवाडी शहर छत्तीस गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्राध्यापक रामदास झोळ सरांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.रिधोरे गावांमधील शेतकरी युवक महिला बालगोपाळ ज्येष्ठ नागरिकांनी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर सचिव सौ. मायाताई झोळ मॅडम यांचे मोठ्या जल्लोषात हलगी नाद करत स्वागत केले.शारदीय नवरात्रीनिमित्त रिधोरे गावामध्ये आई जगदंबा तुळजाभवानीची आरती त्यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली.जनसंवाद यात्रा शेतकरी मेळाव्याला शेतकरी युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.