By : Polticalface Team ,08-10-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील पुणे सोलापूर महामार्गावर दि ०७ ऑक्टोबर रोजी ४ वाजे सुमारास भीषण अपघातात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने हडपसर येथील माळ परडी आराधी महिलेला स्कार्पिओ एम एच 14 जी एस 9616 या गाडीने जोरदार धडक दिल्याने आराधी महिला दहा फूट उंच उडून बाजुला पडली. कदाचित स्कार्पियो च्या समोर पडली असती तर सदर महिलेला चेंगरून गाडी गेली असती अशी भयानक परिस्थिती समोर घडली असल्याने आराधी महिलेचा थोडक्यात जीव वाचवला असुन एक हात फ्रॅक्चर झाला असल्याचे दिसून येत आहे सदर घटना यवत येथे दि ०७ ऑक्टोबर रोजी ४ वाजे दरम्यान घडली आहे. या प्रसंगी स्कार्पिओ गाडीच्या पाठीमागे वेगाने इतर वाहन असते तर सदर महिलेचा मृतदेह पाहवयास मिळाला असता तसेच स्कार्पिओ गाडी मधील प्रवासी देखील जीवाशी गेले असते या दुर्दैवी घटनेत किती जीव गेले असते हे सांगणे देखील मुश्किल झाले असते. या प्रसंगी यवत बस स्टॉप येथील नागरिकांनी व महिलेसोबत असलेल्या आराधी मंडळींनी व नागरिकांनी जखमी झालेल्या महिलेला उचलून हायवे रोड वरून बाजूला घेण्यात आले.
या वेळी उपस्थित नागरिकांची एकच चर्चा होती. देव तारी त्याला कोण मारी. अशी आश्चर्यजनक घटना घडली असून. जखमी महिलेला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे एवजी सदर स्कार्पिओ गाडी चालकाने घटनास्थळा वरून पळ काढला या प्रसंगी पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक चक्का जाम झाली होती. शारदा नवरात्र महोत्सव चालू असल्याने हडपसर येथील आराध्यांचा मेळा यवत या ठिकाणी देवीच्या कार्यक्रमासाठी आले होते. यवत येथील नागरिकांनी जखमी आराधी महिलेला यवत ग्रामीण रुग्णालय येथे औषध उपचारासाठी घेऊन गेले. या बाबत यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना व्हाट्सअप मेसेज द्वारे सदर घटनेची खबर देण्यात आली असून यवत पोलीस सदर घटनेतील नमूद स्कार्पिओ गाडीचा शोध घेत आहेत.
वाचक क्रमांक :