नागवडे कारखाना येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात ११-७२ कोटी जमा करणार.
By : Polticalface Team ,08-10-2024
लिंपणगाव प्रतिनिधी :
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना सन 2023- 24 या गळीत हंगामात गाळप केलेल्या ५ लाख ८५ हजार ४७० मे. टनाकरिता प्रती मे.टन २०० रुपये प्रमाणे ऊस प्रोत्साहन अनुदान म्हणून सुमारे ११ कोटी ७२ लाख रुपये येत्या 20 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी दिली .
प्रसिद्धी पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन 2023 -24 या गळीत हंगामात पाच लाख 85 हजार 470.576 मे टन उसाचे गाळप केले असून सदर उसाच्या संपूर्ण एफ.आर.पी.सह प्रति मे.टन रुपये 2700 याप्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांना अदा केलेला आहे. गळीत हंगाम सुरू करताना व कारखान्याच्या वार्षिक सभेत जाहीर केल्याप्रमाणे सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याकरिता गळीतास आलेल्या उसाचे द्वितीय पेमेंट दोनशे रुपये प्र. मे. टन याप्रमाणे 11 कोटी 72 लाख रुपये 20 ऑक्टोबर चे दरम्यान सभासद शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. असे सांगून नागवडे म्हणाले की, मागील गळीत हंगामात कारखान्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विशेषत: ऊसतोड मजूर कमी आल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. परंतु यावर्षी अशी अडचण येणार नाही याची दक्षता घेत आहोत.
तसेच प्रतिवर्षीप्रमाणे कारखान्यामार्फत सर्व सभासदांना दिवाळी करिता 10 किलो साखर प्रति किलो 20 रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. गतवर्षीप्रमाणे कारखाना कार्यक्षेत्रातील कारखाना साईट, श्रीगोंदा, काष्टी, बेलवंडी व घारगाव या ठिकाणी दि. 15 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर पर्यंत साखर वाटप चालू राहणार आहे. या कालावधीत सभासदांनी आपले आधार कार्ड घेऊन संबंधित साखर वाटप केंद्रातून आपली साखर घेऊन जावी असे नागवडे यांनी सांगितले.
स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचारांचा वारसा घेऊन अनेक अडचणीवर मात करून संचालक मंडळांनी एक विचाराने अत्यंत काटकसरीचा कारभार करून सभासद शेतकऱ्यांच्या शेताला प्राधान्य दिलेले आहे. नागवडे कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांना रास्त व शाश्वत ऊस भाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे व भविष्यातही करणार आहे. नागवडे कारखान्याच्या विश्वासार्हतेला संचालक मंडळ कधीही बाधा येऊ देणार नाही. येणाऱ्या गळीत हंगामात सुद्धा नागवडे कारखाना ऊस भावात मागे राहणार नाही. म्हणून सभासद शेतकऱ्यांनी नागवडे कारखान्यासच ऊस देऊन जास्तीत जास्त गळीत करण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन नागवडे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे व्हा .चेअरमन बाबासाहेब भोस सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे व इतर खाते प्रमुख उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत
हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन
मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये
आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!