करमाळा तहसील कार्यालय नवीन जागी स्थलांतर करण्याच्या विरोधात पाटील गट माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या करणार तहसील कचेरीच्या प्रांगणात धरणे आंदोलन
By : Polticalface Team ,08-10-2024
करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा तहसील व प्रशासकीय कार्यालय नवीन जागेत स्थलांतर विरोधात माजी आमदार नारायण (आबा) पाटील उद्या धरणे आंदोलन करणार असून यासाठी निवेदनाची प्रत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि करमाळा येथील सध्याचे तहसील कार्यालय करमाळा शहरापासून दीड किलोमीटर दूर स्थलांतरित करून नवीन जागेत बांधण्याचा घाट विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी बांधला आहे. या कामाचे टेंडर निघण्या अगोदरच घाई गडबडीत या कामाचे भूमिपुजन करण्यात आले आहे. या कामाची टेंडर नोटिफिकेशन आता उशिरा काढण्यात आली असून 12 ऑक्टोबर ही टेंडर भरण्याची शेवटची मुदत आहे. यामुळे नागरिकांची मागणी नसतानाही हा निर्णय घेतला जातं आहे. वास्तविक पाहता करमाळा तहसील कार्यालयाची सध्याची इमारत ही अतिशय भक्कम आणि वास्तुशास्त्राचा एक उत्तम दाखला म्हणून ओळखली जाते. या तहसील कचेरीच्या अगदी हाकेच्या अंतरावर पंचायत समिती, जमीन खरेदी विक्री, सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेख व नोंदणी कार्यालय, तालुका पोलीस स्टेशन, न्यायालय आदी कार्यालये असून एकदा कचेरी आवारात आले कि नागरिक आपल्या अन्य कामांचा पाठपुरावा अगदी सहजपणे करू शकत आहे. शिवाय करमाळा शहराची मुख्य बाजारपेठ, बसस्थानक व बाजार समिती मध्ये जाणे त्याला शक्य होत आहे. परंतु आता विद्यमान आमदार शिंदे यांनी जाणीवपूर्वक तहसील कार्यालय नवीन जागेत घेऊन जाण्यासाठी आपली ताकद पणाला लावली असून कसल्याही परिस्थितीत आपण करमाळा शहरातील हे लोकांच्या सोयीचे व गजबजाटीचे ठिकाण शहरापासून दूर नेणार असा ठाम निर्णय घेतला आहे. या निर्णयला आवाहन देण्यासाठी तालुक्यातील मोठ्या राजकीय गटापैकी पाटील गटाने उघडपणे विरोध करावयाचे ठरवले असून माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृवाखाली उद्या बुधवारी सकाळी अकरा वाजल्या पासून कचेरीच्या आवारात समोर पोलीस मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार गट ) सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकारी, विविध गावातील स्थानिक स्वराज संस्था अर्थात ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या आंदोलनास करमाळा शहरातील व्यापारी तसेच छोटे व्यावसायिक यांचाही पाठिंबा असल्याचे समजते. यामुळे माजी आमदार नारायण पाटील यांच्या उद्याच्या आंदोलनाकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या निवेदनाच्या प्रति राज्याचे प्रधान सचिव, बांधकाम मंत्रालय सचिव, महसूल विभाग सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, प्रांत यांनाही पाठवन्यात आल्या आहेत. तसेच उद्याच्या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा. पाच आरोपी जेरबंद
टाकळी लोणार जि.प.प्रा.शाळेतील आदित्य मोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत निवड
नवरा बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव. आरोपी पती पत्नीवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. आंबेगाव येथील घटना.
तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पती पत्नीला मारहाण करून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. देऊळगाव राजे येथील घटना
शेळ्या चोरणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून गाडी थांबवली. दोन इसम आंधारामध्ये पळून गेले. एकास दौंड पोलीसांनी पकडले. तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
श्रीगोंद्यात मोहरम उत्सव उत्साहात साजरा
अहिल्यानगर जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील शिवपानंद शेख रस्ते प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढावीत , राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
स्वामी चिंचोलीच्या घटनेतील त्या दोन संशयित नराधमांना पोलिसांनी घेतले ताब्यात
वरुणराजाच्या हजेरीत नागवडे स्कूल ची बालदिंडी उत्साहात संपन्न. बालदिंडी चे विक्रमी २५ वे वर्ष.
शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशाची अंमलबजावणीसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून दयावी. _जयवंत भाबड
शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश – औरंगाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू
करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन
मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये
आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू