By : Polticalface Team ,17-10-2024
दौंड (प्रतिनिधी)येथे संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा/समृद्धी योजनेच्या दौंड तालुका सदस्य अशासकीय पदी मिथुन राठोड यांची नियुक्ती करण्यात आली.
बंजारा समाजासाठी एक मोठा सन्मान,सतत आपल्या सामाजिक कामातून नवीन ओळख निर्माण करणे सामजाच्या सर्वागीण विकासासाठी सतत अग्रेसर पुढे येणे. तसेच बंजारा समाजाच्या विकास आणि समृद्धीला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना अंतर्गत मिथुन राठोड यांची दौंड तालुका अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या या योजनेचा उद्देश बंजारा तांड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांचा अंमलबजावणी करणे आहे.
मिथुन राठोड यांच्या निवडीमुळे बंजारा समाजाच्या विकासासाठी नवे दार उघडले आहे, असे समाजातील तज्ञ मानत आहेत. या योजनेमुळे बंजारा तांड्यांमधील मुलभूत सुविधा, रोजगाराच्या संधी, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
सोनवडी, गिरीम बंजारा समाजातील ज्येष्ठ नेत्यांनी आणि नागरिकांनी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली योजना प्रभावीपणे राबवली जाईल, अशी अपेक्षा आहे. शेवटी मिथुन राठोड यांनी राज्य सरकार व समाजाचें जाहीर आभार मानले.
वाचक क्रमांक :