By : Polticalface Team ,18-10-2024
करमाळा : प्रतिनिधी
हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतिक असणाऱ्या आवाटी येथील सुफी हजरत वली चांद पाशा दर्गाह मध्ये येत्या सोमवार,21 आक्टोबर 2024 उर्दू तारीख 17 ग्यारहवी शरीफ हिजरी सन 1446 रोजी जश्ने गौसे आजम निमित्त विविध भरगच्च धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष हाजी कादरभाई तांबोळी यांनी दिली
आवाटी येथे प्रति वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी जश्ने गौसे आजम निमित्त दर्गाह परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत जियारते मुए मुबारक आणि गिलाफे मुबारक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय तोशे की नियाज चे आयोजन करण्यात आले आहे. आलेल्या भक्तगणांना दिवसभर लंगर खाना अर्थात महाप्रसाद देण्यात येणार आहे. सदर लंगरखानाचा आस्वाद भाविक भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
जश्ने गोसे आजम निमित्त आवाटी येथील वली बाबा दर्गाह मध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून राज्य तसेच परराज्यातून आलेल्या भक्तगणाची राहण्याची व पार्किंगची व्यवस्था दर्गाह ट्रस्टच्या वतीने योग्य पद्धतीने करण्यात आली आहे.
सध्या पवित्र असा ग्यारहवी शरीफ चा महिना असून या महिन्यांमध्ये मुस्लिम बांधव बगदाद शरीफ येथील हजरत गौसे आजम यांच्या स्मृती प्रित्यर्थ ग्यारहवी शरीफ महिना मोठ्या उत्साहात साजरा करतात. याचाच एक भाग म्हणून आवाटी येथील दर्गाह मध्ये गौसे आजम चा कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो.
सदरच्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन दर्गाह ट्रस्टच्या वतीने वली बाबा चे खादीम गुलामनबी कादरी , इरफान कादरी व बाबाचे सज्जादे नशीन सुफी हसनैन कादरी यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :