By : Polticalface Team ,23-10-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड पुणे ता २१ ऑक्टोबर २०२४ पुणे शहरातील सोमवार पेठ पोलीस लाईन शताब्दी व गुणगौरव सोहळा कार्यक्रम हा महाराष्ट्रातील नाही तर भारतातील पहिला शासकीय पोलीस वसाहतीचा शतकपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन. सोमवार पेठ पोलिस लाईन शताब्दी व गुणगौरव सोहळा समितीच्या वतीने करण्यात आला होता. सोमवार पेठ पोलिस लाईन वसाहतीची स्थापना १९२४ या कालखंडात करण्यात आली या ठिकाणी राहणाऱ्या आजी-माजी पोलीस प्रशासन खात्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व निवृत्त पोलीस कर्मचारी यांनी सांगितले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनाजीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर पुणे महापालिकेच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांना ही विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक प्रवीण तरडे, भूमी व अभिलेख विभागाचे उपसंचालक राजेंद्र गोळे यांच्या सह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली होती.
२१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय शाहिद दिन म्हणून भारत देशात पळला जातो. या कार्यक्रमाच्या निमित्याने देशातील वीर शहीद जवानांना उपस्थित मान्यवरांनी मानवंदना दिली. या वेळी बोलताना म्हणाले २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीनच्या सैनिका सोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. तेव्हा पासून २१ ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. वर्ष भरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले. अशा जवानांना आज २१ ऑक्टोबर रोजी मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहण्यात येते. जिल्ह्याच्या मुख्यालयात शहीद पोलिसांना अभिवादन केले जाते. तसेच विविध उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले सोमवार पेठ पोलीस लाईन शताब्दी महोत्सव कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाच्या आठवणींचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आयोजकांनकडून करण्यात आले होते.
सोमवार पेठ पोलीस लाईनला शंभर वर्षे पूर्ण झाले म्हणून जो वर्धापन दिन साजरा करत आहेत तो फक्त पुण्यातलाच नाही तर देशातला हा पहिला वर्धापन दिन आहे. अशा महाराष्ट्रात भरपूर पोलीस लाईन आहेत परंतु त्याच्यापेक्षा जुन्या किती आहेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसे पाहिले तर काही साठ वर्षाच्या देखील पोलीस लाईन आहेत तर ७५ किंवा १०० वर्षाच्या देखील आहेत काही सव्वाशेर वर्षाच्या पोलीस लाईन आहेत. मात्र पुणे येथील सोमवार पेठ पोलीस लाईन शताब्दी महोत्सव कार्यक्रम हा महाराष्ट्रातील नाही तर भारतातील पहिला शासकीय वसाहतीच्या शतक पूर्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हि बाब अतिशय महत्त्वपूर्ण आहे.या ठिकाणी सोमवार पेठ पोलिस लाईन मध्ये राहणारी अनेक युवा तरुण पिढी आपल्या कर्तबगारिने उदयास आली आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून येत आहे. तसेच प्रत्येक पोलीस लाईन मध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत असतात. परंतु असे काही कार्यक्रम असतात की सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन सार्वजनिक उपक्रम राबिवल्याने विविध समाजातील लोकांमध्ये आपुलकी व आगळे वेगळे चित्र निर्माण झाल्या शिवाय राहत नाही. सोमवार पेठ पोलीस लाईन शताब्दीच्या निमित्ताने समोर आले. असे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्यात व्हावेत अशी भावना निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमासाठी सोमवार पेठ पोलिस वसाहतीसह शहरातील विविध पोलिस वसाहती मधील वरिष्ठ पोलिस अधिकारी, तसेच निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांनी देखील प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली होती.
वाचक क्रमांक :