पाटस-कानगाव पोलीस स्टेशन हद्दीत झाला होता अपघात. पोलीसांनी लावला तपास. ५ लाखाची होती खुनाची सुपारी. दोन आरोपींना पोलिस कस्टडी

By : Polticalface Team ,24-10-2024

पाटस-कानगाव पोलीस स्टेशन हद्दीत झाला होता अपघात. पोलीसांनी लावला तपास. ५ लाखाची होती खुनाची सुपारी.  दोन आरोपींना पोलिस कस्टडी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २४ ऑक्टोबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे पाटस कानगाव रोडवर दि १७/१०/२०२४ रोजी रात्री १०:४५ वाजे सुमारास. पाटस बाजुकडुन कानगाव बाजुकडे फिर्यादी वैभव दिवेकर हे हिरो होंडा सी.डी. डिलक्स मोटार सायकल नं.एम.एच.४२ सी. ९८४३ या वरून घरी जात असताना अपघाताची घटना घडली होती. यामध्ये ग्रे रंगाची हुंडाई कंपनीची वेनू मॉडेल नंबर नसलेली चार चाकी कार या वरील अज्ञात चालकाने भरधाव वेगात कानगाव बाजुकडे जात असताना फिर्यादी यांचे मोटार सायकलला पाठीमागुन जोरदार धडक देऊन. वाहन चालक पळुन गेला असल्याने पाटस पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर अपघाताचे अनुषंगाने घटनास्थळी पंचनामा केला असता व अपघातग्रस्त वाहनांची परीस्थीती पाहता सदर अपघात नसून हा घातपात असल्याची दाट शक्यता वाटत असल्याने पाटस पोलीस उपनिरीक्षक सलिम शेख यांनी वरीष्ठांना सदर घटनेची माहिती कळवुन वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्रिंक विश्लेषन व सी.सी.टी.व्ही. तपासणी केली. तसेच गोपनीय बातमीदार मार्फत माहीती घेवुन अपघाताची सखोल चौकशी केली असता सदरचा प्रकार हा अपघात नसुन अपघाताचा बनाव कट रचुन खुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे. या मध्ये संशयीत आरोपी १)अक्षय गोपीनाथ चव्हाण वय-२७ वर्षे सध्या रा.पाटस ता. दौंड जि.पुणे मुळ रा.खेड ता.कर्जत जि. अहमदनगर याला ताब्यात घेवुन सदर गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता. त्याने सांगितले कि जखमी नामे वैभव दिवेकर रा.पाटस ता.दौंड जि.पुणे यास चार चाकी गाडीने ठोस देवुन जीवे ठार मारण्यासाठी २) अक्षय बबन कोळेकर, रा.पाटस ता. दौंड जि. पुणे. याने मला तसेच ३)तुषार चोरमले, ४)सुरज विजय पवार. रा.पाटस ता.दौड जि. पुणे, ५)लाला पाटील. रा.भिगवण ता. इंदापुर जि.पुणे असे चौघांना ५ लाखाची सुपारी दिली असल्याचे कबुल केले आहे. सदर प्रकरणी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले असून आरोपी १)अक्षय गोपीनाथ चव्हाण, ४)सुरज विजय पवार हे दोघे ही रा.पाटस ता.दौंड जि पुणे. अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अशी माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. सदत्वी कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.पंकज देशमुख साो पुणे ग्रा, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.गणेश बिरादार सो बारामती विभाग, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापुराव दडस सो, दौंड विभाग, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक सलीम शेख, पासेई वागज, पोहवा गुरुनाथ गायकवाड, सहा. फौजदार महेंद्र फणसे, सहा. फौजदार अनिल ओमासे, सहा. फौजदार भानुदास बंडगर, पोहया हिरालाल खोमणे, पोहवा अक्षय यादव, पोहवा संदीप देवकर, पोहवा महेंद्र चांदणे, पोहवा विकास कापरे, पोहवा रामदास जगताप, पोहवा/कानिफनाथ पानसरे, पोकों मारूती बाराते, पोकों गणेश मुटेकर यांनी केली असुन यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आले असुन ते सध्या पोलीस कस्टडी मध्ये आहेत तरी सदर गुन्हयाचा पुढील तपास पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलिम शेख. हे करीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद