By : Polticalface Team ,25-10-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २५ ऑक्टोबर २०२४ दौंड विधानसभा क्रमांक (१९९) मतदार संघातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील पालक नागरिकांना मतदान करण्यासाठी विद्यार्थी मुलांनी दिला संदेश. या बाबत अधिक माहिती अशी की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तसेच अंगणवाडी सेविकांनी दि.२५/१०/२०२४ रोजी यवत पंचक्रोशीतील नागरिकांच्या भेटी घेऊन मतदान करा या संदर्भात जन जागृती अभियान राबविले. या वेळी प्रामुख्याने दौंड तालुका अधिकारी तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी.मा कुणाल धुमाळ. यांच्या मार्गदर्शनाखाली यवत गावातील अंगणवाडी पर्यवेक्षिका सुवर्ण शिवतारे सुमन सावंत वैशाली चव्हाण मुमताज सय्यद. आदी विद्यार्थी मुला मुलींनी सहभाग घेतला होता. मतदान करणे हा नागरिकांचा अधिकार असून प्रत्येकाने न चुकता मतदान करणे आवश्यक आहे. अशी महत्वपूर्ण भूमिका घेऊन. गावातील मतदारांशी संवाद साधुन मतदान जन जागृती प्रचार व प्रसिध्दी करण्यात आली. या प्रसंगी बोलताना म्हणाले लोकांनी लोकांसाठी तयार केलेले गण राज्य व संविधानिक दिलेला अधिकार गणतंत्र्यावर आधारित आहे. त्यामुळे मतदानासाठी वेळ काढा. आपली संविधानिक जबाबदारी पार पाडा. आपल्या मतांचा अधिकार बजवा. लोकशाही रुजवा. अशा विविध स्वरूपाचे फलक घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व अंगणवाडी सेविकांनी गावातील नागरिकांना आव्हान करुन मतदानाचा हक्क बसवण्याचा संदेश दिला. आम्ही असा संकल्प करतो की, आम्ही भारताचे नागरिक लोक शाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राख् या निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु, तसेच आमच्या कुटुंबातील सर्व मतदार, शेजारी व मित्र परिवार यांना देखील मतदान करण्यासाठी पालक व नागरिकांना प्रोत्साहित करु असा संकल्प केला. तोच देश होईल महान. ज्या देशात शंभर टक्के मतदान. या वेळी दौंड तालुका अधिकारी तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी कुणाल धुमाळ. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे यांनी मतदान जन जागृती अभियानासाठी महत्त्वाचे सहकार्य केले तसेच अंगणवाडी पर्यवक्षिका सुवर्ण शिवतारे सुमन सावंत वैशाली चव्हाण मुमताज सय्यद. विद्यार्थी मुला मुलींची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
वाचक क्रमांक :