By : Polticalface Team ,25-10-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता 25 ऑक्टोबर 2024 दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी ता जिल्हा पुणे. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील कासुर्डी येथील वयवृद्ध महिला कौशल्या सोपान सोनवणे हीचा सांयकाळी 7.30 वा जे सुमारास मोटर सायकलने धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना दि 14/10/2024 रोजी घडली असल्याने फिर्यादी विकास सोपान सोनवणे रा. कासुर्डी ता. दौंड. जि. पुणे. यांच्या तक्रारी वरून यवत पोलीस स्टेशन येथे दि 23/10/2024 रोजी गु.र.नं. 1042/2024- बी एन एस कलम 281,125 (a), 125 (b), Mv Act 184, 134 / 177 अंन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कासुर्डी गावचे पोलीस पाटील अश्विनी सोनवणे यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती अशी की दि.14/10/2024 रोजी रात्री 8.10 वाचे. सुमारास फिर्यादी नेहमी प्रमाणे कामा वरून घरी येणेसाठी मांजरी रेल्वे स्टेशन येथे थांबले होते. त्यावेळी चुलत भाऊ गौरख संपत सोनवणे याने फोन वरून कळविले की, तुझी आई कौशल्या सोपान सोनवणे हीचा सांयकाळी 7.30 वा जे. सुमारास. कासुर्डी गावातून रोडने चालत जात असताना दौलत आनंदा ठोंबर यांचे घरा जवळ गावातील प्रेमराज उध्दव ठोंबरे याने त्याचे ताब्यातील एस.एफ. डीलक्स मोटर सायकल नं एम. एच 42 ए एन 8058 या गाडीने पाठिमागुन धडक दिल्याने तुझी आई कौषल्या ही जखमी झाली असुन, तीला आम्ही ठोंबरे हॉस्पीटल कासुडी येथे प्राथमिक औषध उपचार कामी नेले असुन पुढील उपचारासाठी तीला विठ्ठल हॉस्पीटल उरुळी कांचन येथे घेऊन जात आहे. तु तेथेच ऐ असे सांगीतले. हॉस्पीटल मध्ये जावून पाहीले असता सदर ठिकाणी फिर्यादी ची आई बेशुध्द अवस्थेत असुन तीचेवर औषध उपचार चालु होते. तेव्हा फिर्यादीने मोटर सायकल चालकाचे वडील उध्दव ठोंबर यांना फोन करून सांगितले तुमचा मुलगा प्रेमराज ठोंबरे याच्या मोटर सायकलने आमच्या आईला धडक देऊन अपघात झाला आहे. त्यामध्ये आईला मार लागुन गंभीर दुखापत झाली असल्याने विठ्ठल हॉस्पीटल येथे उपचार घेत आहे. तुम्ही या ठिकाणी या असे फिर्यादीने सांगितले तेव्हा उध्दव ठोंबरे म्हणाले तुम्ही उपचार चालु ठेवा होणारा सर्व खर्च मी तुम्हाला देतो असे त्यांनी सांगीतले. फिर्यादीने दोन दिवस त्याची वाट पाहिली मात्र उद्धव ठोंबरे हे हॉस्पिटलमध्ये आले नाहीत. त्यांनी उपचारासाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य किंवा मदत केली नाही. जखमी कौशल्या हीचा डावा पायची नडगी फॅक्चर झाली असून तीच्या खांदयाला, बरगडीला मार लागला असुन पोटामध्ये रक्त श्राव होत आहे. असे डॉक्टरांकडून समजले असल्याने यवत पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास आलो असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दि 14/10/2024 रोजी सांय 7.30 वाचे सुमारास मौजे कासुर्डी ता दौंड गावचे हद्दीत कासुर्डी गावाकडे जाणरे रोडवर कौशल्या सोपान सोनवणे वय 55 वर्ष ही महिला पायी चालत घरी जात असताना पाठिमागुन येणारा मोटार सायकल चालक प्रेमराज उध्दव ठोंबरे वय 17 वर्ष रा कासुर्डी त्याचे कडील मोटार सायकल नं. एम 42 ए एन 8058 या वरून कासुर्डी फाटा बाजुकडुन भरधाव वेगात हयगयीने, अविचाराने, रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून कौशल्या सोपान सोनवणे यांना पाठिमागुन ठोस दिल्याने अपघात झाला. या अपघातात फिर्यादी यांची आई जखमी होऊन. त्यांच्या डावे पायाची नडगी फॅक्चन झाली असून इतर गंभीर व किरकोळ दुखापतीस. सदर इसम प्रेमराज उध्दव ठोंबरे हा कारणीभुत असुन घडलेल्या अपघाताची कोणास खबर न देता तिथून निघून गेला. म्हणुन त्याचे विरुध्द तक्रार आहे. असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून दाखल अंमलदार पो हवा खैरे. पुढील तपास अंमलदार सहा फौज जी डी भोसले करीत आहेत.
वाचक क्रमांक :