By : Polticalface Team ,28-10-2024
अनुराधा नागवडे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला तर धनशाम शेलार यांनी साधेपणाणे उमेदवारी अर्ज दाखल केले
श्रीगोंदा. नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत साजन पाचपुते व बाबासाहेब भोस यांच्या प्रमुख उपस्थितीत अनुराधा नागवडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या वेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून घोषणा देत परीसर दणानुन टाकला तर आमदार बच्चु कडु यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने घनश्याम शेलार यांनी साध्या पध्दतीने कुठलेही शक्ती प्रदर्शन न करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या वेळी बोलताना अनुराधा नागवडे म्हणाल्या की विजय हा आपलाच होणार आहे तर घनश्याम शेलार यांनी ही विजयाचा दावा केला आहे यावेळी बोलताना शेलार म्हणाले की माजी लढाई तालुक्यातील साखर सम्राटांविरोधात आहे आणि ही लढाई मी जिंकणारच आहे एकंदरीत पाहता सर्वच उमेदवार विजयाचे दावे प्रति दावे करताना दिसत आहेत सेवटी मतदार हा राजा आहे तो कोणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकणारं ते निकाला नंतरच समजणार आहे हे मात्र नक्की...
कार्यकारी संपादक
शफीक हवालदार
मो.9730668907
वाचक क्रमांक :