श्रीगोंद्याच्या लोकप्रतिनिधीकडून 40 वर्षे केवळ घोषणा आणि गलथान कारभार, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांचा आरोप

By : Polticalface Team ,30-10-2024

श्रीगोंद्याच्या लोकप्रतिनिधीकडून 40 वर्षे केवळ घोषणा आणि गलथान कारभार, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांचा आरोप

लिंपणगाव( प्रतिनिधी):- ८० च्या दशका पर्यंत स्व.शिवाजी राव नागवडे यांनी दुष्काळी आणि खाजगी साखर कारखान्याच्या मनमानी कारभाराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना साखर कारखान्याचा मालक बनवून तसेच पाटपाणी उपलब्ध करून शिक्षणाची सुविधा तालुक्यात सुरू करून विकसित श्रीगोंदा तालुक्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण केले पण पुढे ४० वर्षे केवळ घोषणा आणि गलथान कारभारामुळे श्रीगोंदा मतदार संघात विकास केवळ कागदावर राहिला कुकडी प्रकल्प पूर्ण झाल्यावर बागायती क्षेत्र वाढले; पण दरवर्षी उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने टँकरने पाणी द्यावे लागते तर काहींनी बागा मोडून टाकल्या एमआयडीसी चे स्वप्न विरोधी पक्षाच्या आमदारांनी अनेकदा दाखवले काही गावांचे नकाशे दाखवले पण आजही ही योजना कागदावरच आहे. आजही तालुक्यातील कुशल,अकुशल कामगार नगर,कुरकुंभ, कारेगाव,रांजणगाव येथील एमआयडीसी मध्ये कामाला जाताना दिसतो उद्या यात कर्जतच्या एमआयडीसी ची भर पडली तर नवल वाटायला नको. साकळाई उपसा जलसिंचन योजना देखील कागदावरच आहे. अनेकांनी घोषणा केल्या सर्व्हे देखील झाला पण कोळगाव,चिखली आणि नगर तालुक्यातील या योजनेच्या लाभक्षेत्र मध्ये येणारी गावे आजही तहानलेली आहे यासर्व दुर्लक्ष कारभारामुळे जनता आता बदलाच्या प्रतीक्षेत आहे. लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आला विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होणार असल्याने भाजप आता उमेदवार बदलाच्या तयारीत आहे पण विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक,शेतमजूर,शेतकरी या राजकीय अनस्थेला वैतागला आहे म्हणून परिवर्तन अटळ आहे. असे. राजेंद्रदादा नागवडे यांनी म्हंटले असून; 

श्रीगोंदा तालुका वेगाने वाढत आहे पण रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. मध्यंतरी कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या निविदा निघाल्या कामे सुरू झाली पण टक्केवारीचा खेळ सुरू झाला आणि रस्त्यावरचे डांबर खडी घेऊन बाहेर पडले पुन्हा रस्त्यांची दुरवस्था सुरू झाली आहे. .

पाण्याचे न्याय वाटप,विसापूर खालील  ८ गावांचा समावेश,वितरिका क्रमांक १० ची मंजुरी, डिंभे - माणिकडोह बोगदा, टेल टू हेड आवर्तन मधील श्रीगोंदा तालुक्या वरील अन्याय हे सारे प्रश्न आजही भेडसावत आहेत यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. यात कहर म्हणजे नगर - दौंड रस्त्यावरील टोल नाका परिसरातील वाहन चालकांना यातून सुट न दिल्याने नाराजी आहे निवडणूक डोळ्या पुढे ठेऊन महिनाभर टोल वसुली बंद आहे पण पुढे काय ? हा प्रश्न स्थानिकांना आहे. .

कोरोना काळात लोकप्रतिनिधी कोविड सेंटर सुरू करण्याऐवजी स्वस्थ बसले नागरिक आपल्या परीने उपचारासाठी इतरत्र धावपळ करत होते. पण लोकप्रतिनिधी मौन बाळगून बसले. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना मार्फत चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी कोवीड सेंटर सुरू केले.

गेल्या ५ वर्षात नागरिक विविध दाखले,रेशनिंग कार्ड,साठी शासकीय कार्यालयात धावपळ करत राहिले  पण  प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी यांना लोकप्रतिनिधी जाब विचारू शकले नाही,सर्वच शासकीय कार्यालयात नागरिकांना पैसा आणि वेळ खर्च करावा लागला,श्रीगोंदा पेक्षा भौगोलिक आणि लोकसंख्येने कमी असलेल्या कर्जत मध्ये अद्यावत शासकीय रुग्णालय असताना श्रीगोंदा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय कागदावर राहिले आजही सोनोग्राफी,सिझर साठी खाजगी दवाखाने किंवा दौंड,शिरूर,नगरला धाव घ्यावी लागते.,श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्मचारी वसाहत नाही,पोलीस ठाणे ब्रिटिश कालीन जुन्या तहसील कार्यालयात कामकाज पाहत आहे. इतर तालुक्यात झपाट्याने काया पालट होत असताना श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात याचा प्रत्यय येत आहे. त्यामुळेच या मतदार संघात केवळ आमदाराचे पुत्र सर्व्हे मध्ये मागे पडले नाही तर भाजपच मागे पडली आहे.जनतेला आता बोले तैसा चाले याप्रमाणे शेतकरी,शेतमजूर,रुग्ण,विद्यार्थी यांच्यासाठी झटणारे नागवडे कुटुंबाला  मतदार संघात प्रतिसाद मिळत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये; असेही मा. राजेंद्रदादा नागवडे यांनी शेवटी  म्हंटले आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

पहा स्वामी समर्थ प्रकटदिन विशेष माहिती

दौंड शालीमार चौकामध्ये बेकायदा कल्याण मटका जुगार.पैसे घेऊन लोकांना मटका खेळणाऱ्या इसमावर पोलीसांनी केली कारवाई

दौंड शहर गांधी चौक येथील जुगार अड्ड्यावर पोलीसांची छापेमारी चौघांन विरुद्ध गुन्हा दाखल 1 हजार 400 रुपये मुद्देमाल केला जप्त.

श्रीगोंदा तहसील व भूमी अभिलेख कार्यालयाकडून श्रीगोंदा तालुका राज्याला दिशादर्शक रोड मॉडेल बनवण्याचा ऐतिहासिक निर्णय!

के पी जाधव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे बारावीच्या परीक्षा केंद्रावर संपूर्ण परीक्षा सुरळीत संपन्न

श्री व्यंकनाथ विद्यालयाने शंभर दिवस विविध उपक्रमांचे विस्ताराधिकाऱ्यांकडून समाधान

काष्टी येथील परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाची यशोगाथा, 39 विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि.नामांकित कंपनीमध्ये निवड

काष्टी येथील परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाची यशोगाथा, 39 विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि.नामांकित कंपनीमध्ये निवड

23 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गिरान’ची विशेष निवड

जबरी चोरीच्या उद्देशानेच आरोपी गेले होते. इतर कोणताही उद्देश नव्हता चोरांची कबुली. मा.पोलीस अधिक्षक पंकज देशमुख

सहजपुर गाडमोडीत कल्याण मटका जुगार जोरदार. अवैध धंदे चालवणाऱ्या महाठकांचा तत्काळ बंदोबस्त करा. नागरीकांची मागणी.

कडेठाण येथील लता बबन धावडे यांचा वन्य प्राण्यांच्या हल्लात मृत्यु झाला नाही. प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळा नागपुर अहवाल प्राप्त. दगडाने ठेचुन जिवे ठार मारले.

दौंड तालुक्यातील मौजे भांडगाव येथील लक्ष्मी इन्टर प्रायजेस या कंपनीतील आगीमध्ये सुमारे ३५ लाख रूपयांचा माल जळून खाक.

पाटबंधारे विभागाच्या हद्दीत पत्रा शेड तयार करून १ लाख ५० हजार घेऊन विक्री. निराधार विधवा महिलेची फसवणूक.

मुळा मुठा कालवा पुलाच्या अपूर्ण बांधकामामुळे कासुर्डी नागरिकांना घालावा लागतोय दुरुन वळसा.

महाराजा जिवाजीराव शिंदे विद्यालयात 395 वी शिवजयंती उत्साहात साजरी

ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी कारवाईची मागणी

मराठी चित्रपट लवेरिया थेट YouTube वर रिलीज; १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी परीक्षेत श्रीगोंद्यातील दोन सख्या बहिणींनी केले यश संपादन

नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वृक्ष लागवडीचे घोडे अडले कुठे? , पाच वर्षांनंतरही वनविभागाचे अधिकारी वृक्ष लागवडी बाबत अनभिज्ञ नंदकुमार कुरुमकर

भारतीय बौध्द महासभा कोरेगाव मूळ ग्रामशाखेच्या वतीने माता रमाई जयंती साजरी. समता सैनिक दलाची साप्ताहिक परेड संपन्न.