दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अट्टल घरफोडी दरोडा गुन्ह्यातील फरारी आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात.

By : Polticalface Team ,30-10-2024

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अट्टल घरफोडी दरोडा गुन्ह्यातील फरारी आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ३० ऑक्टोबर २०२४. दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील व परिसरातील दरोडा, घरफोड्या करणारा. अट्टल गुन्हेगार मागिल १ वर्षा पासुन फरार असलेला आरोपी मिथुन प्रकाश राठोड रा. राघोबा नगर. गिरीम ता. दौंड जि. पुणे यास दौंड पोलीस गुन्हे शोध पथकाने अटक केली असल्याची माहिती दौंड पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली. या बाबत अधिक माहिती अशी की दि.०६/०१/२०२४ रोजी फिर्यादी नामे आशिष रमेश प्रजापती रा.कुरकुंभ ता.दौड. यांचे राहते घरा मध्ये पाच अनोळखी इसमानी प्रवेश करून फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी देवुन. जबरी चोरी करून फिर्यादीचा मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ४६ हजार रुपये किंमतीचा माल दरोडा टाकुन घेवुन गेले होते. सदर गुन्हया मध्ये आरोपी मिथुन प्रकाश राठोड रा.राघोबा नगर गिरीम ता.दौंड जि.पुणे. हा गुन्हा घडल्या पासुन आरोपी फरार होता. तसेच इतर २ घरफोडीमध्ये ही तो गुन्हा घडल्या पासुन फरार होता. सदरचा आरोपी हा काल ता. २९/१०/२०२४ रोजी मौजे गिरीम, ता दौंड जिल्हा पुणे. राघोबा नगर येथे आल्याची माहिती पोलीसांना मिळाल्याने दौड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने त्यास अटक केली आहे. सदर आरोपी विरूध्द भिवंडी पोलीस स्टेशन हद्दीत एकुण १२ गुन्हे दाखल असुन. दौड पोलीस स्टेशन हद्दीत एकुण ५ गुन्हे दाखल असल्याचे दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी सांगितले. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक पंकज देखमुख. मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस. पोलीस निरीक्षक श्री. गोपाळ पवार. यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, सहा.पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री.उगले, पो. हवा. सुभाष राउत, पो. हवा नितीन बोराडे, पो.हवा.विठ्ठल गायकवाड, पो.हवा. अमिर शेख, पो. हवा. निखील जाधव, पो.कॉ.नितीन दोडमिसे, पो.कॉ.पवन माने, पो.कॉ.जागताप यांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद