By : Polticalface Team ,31-10-2024
श्रीगोंदा : प्रतिनिधी/शफीक हवालदार श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाली असली तरी श्रीगोंद्यातून विक्रम पाचपुते यांचीच उमेदवारी जाहीर करून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावे,अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रकृतीमुळे त्यांच्या पत्नी डॉ.प्रतिभा पाचपुते यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आला आहे.परंतु आमदार पाचपुते यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता प्रतिभा पाचपुते यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते यांनीही पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचपुते यांच्या श्रीगोंदा येथील माऊली संपर्क कार्यालयात आ.पाचपुते यांची मतदार संघातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भेट घेऊन उमेदवारी बदलाबाबत चर्चा केली.
यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी आ.पाचपुते यांच्या पत्नी डॉ.प्रतिभा पाचपुते यांच्या मागणीचा व भावनेचा विचार करून त्यांच्या ऐवजी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते हेच भाजपाचे उमेदवार पाहिजेत असा एकमुखी सुर काढला.आमदार बबनराव पाचपुते हाच आमचा पक्ष व आ.पाचपुते सांगतील तोच उमेदवार अशा भावना व्यक्त करून आ.पाचपुते देतील तो उमेदवार आम्ही निवडून आणणार असे पोपटराव खेतमाळीस, गणपतराव काकडे, बाळासाहेब महाडीक, प्रताप पाचपुते,माऊली हिरवे, मारुती औटी, बाबासाहेब काळे, सुभाष निमसे, संतोष भापकर,नानासाहेब कोथंबिरे,पुरुषोत्तम लगड, मिलिंद दरेकर तसेच प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय कार्यकर्त्यांनी चर्चेदरम्यान विक्रम पाचपुते यांचीच उमेदवारी द्या अशी आग्रही मागणी केली.
त्यामुळे आता विक्रम पाचपुते यांची उमेदवारी राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाच्या वरिष्ठांना कळवू व निर्णय घेऊ असे सांगितले.
प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी डॉ.प्रतिभा पाचपुते व विक्रम पाचपुते यांच्या उमेदवारी बाबत भावना व्यक्त केल्या.
विक्रमसिंह यांची उमेदवारी सक्षम ठरणार....भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते यांना तरुण वर्गाचा प्रतिसाद चांगलाच वाढला आहे.आमदार पाचपुते यांच्या आजारपणामुळे तालुक्यातील विकासकामांसाठी मंत्रालयात जाऊन निधी मिळवण्याची हातोटी विक्रम यांच्याकडे आहे.तसेच जुन्या नव्या कार्यकर्त्यांची सांगड घालण्यात विक्रम पाचपुते यांना चांगला अनुभव आहे.या सर्व बाबींमुळे विक्रम पाचपुते यांची उमेदवारी सक्षम ठरणार आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई