श्री काळभैरवनाथांना साक्षी ठेवून सांगतो. राहुल दादांच्या विजया मध्ये. यवत गावच्या मतांचा सर्वात जास्त वाटा असेल. उपसरपंच सुभाष यादव.

By : Polticalface Team ,01-11-2024

श्री काळभैरवनाथांना साक्षी ठेवून सांगतो. राहुल दादांच्या विजया मध्ये. यवत गावच्या मतांचा सर्वात जास्त वाटा असेल. उपसरपंच सुभाष यादव. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०१ नोव्हेंबर २०२४ दौंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार अँड राहुल कुल यांनी दि ३१ ऑक्टोबर रोजी. दौंड तालुका पच्छिम भागातील प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने खामगाव. नांदूर. सहजपुर. बोरीभडक. डाळींब. बोरिऐंदी ताम्हाणवाडी. भरतगाव. कासुर्डी. व रात्री ७:३० वाजता. प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरा समोर गावातील मतदारांच्या भेटी घेऊन संवाद साधला. या प्रसंगी यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर दोरगे उपसरपंच सुभाष यादव. गणेश शेळके. सुरज चोरगे. संदिप दोरगे. तसेच युवा तरुण कार्यकर्त्यांनी पारंपरिक ढोल ताशा पथकाच्या व फटाक्यांच्या धुमधडाक्यात भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार अँड राहुल कुल यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी गावातील जेष्ठ नागरिक ह भ प नानासाहेब दोरगे महाराज. डॉ शाम कुलकर्णी. यांच्या हस्ते अँड राहुल कुल यांना शाल पुष्पगुच्छ देऊन. यवत नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.या वेळी. नेते बाळासाहेब लाटकर. महादेव दोरगे महाराज. माजी उपसरपंच नाथा आबा दोरगे. रमेश शेठ जैन. शब्बीर भाई सय्यद. आदी जेष्ठ नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.या प्रसंगी आमदार अँड राहुल कुल यांच्या माध्यमातून यवत गाव पंचक्रोशीतील झालेल्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या विकास कामांनबात नेते बाळासाहेब लाटकर यांनी प्रस्तावनेच्या माध्यमातून बोलताना माहिती दिली. या प्रसंगी भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार अँड राहुल कुल यांनी मनोगत व्यक्त केले. स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा कुल. माजी आमदार रंजनाताई कुल यांच्या कार्याचा आढावा देऊन. उपस्थित नागरिकांना जुन्या आठवणींना उजाळा दिला कालांतरातील दौंड तालुक्यातील पूर्व परिस्थिती पाहता खराब रस्ता सुरु झाला की दौंड तालुक्यात प्रवेश केल्याचे बोलले जात असे. मात्र आज रोजी तालुक्यात प्रवेश करताच दौंड तालुका सुरू झाल्याचे बोलले जात आहे. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने तालुक्यात विकासात्मक कामांसाठी. जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दूर दृष्टीने विविध कामांसाठी प्रयत्नशील राहिलो. भीमा पाटस सहकारी साखर कारखाना भाडे तत्त्वावर देऊन कायदेशीर बाबींचा विचार करून सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पिण्याचे व शेतीचे पाणी संदर्भात महत्वपूर्ण भूमिका घेऊन पुढल काळात उणीव भासणार नये याची दक्षता घेऊन नियोजनबद्ध काम हाती घेतले असल्याचे अँड राहुल कुल यांनी बोलताना सांगितले. ते पुढे बोलताना ते म्हणाले. एका मोठ्या झाडा खाली दौंड चे झाड कधी वाढलेच नाही. तेव्हा आपण स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय.काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नेते एका बाजूला आणि कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला मतदान केल्याचा खुलासा समोरच्या लोकांनी दिली असून. या निवडणुकीत कोणत्या मुद्द्यावर जनतेच्या समोर जाणार आहेत हा खरा प्रश्न मतदारांकडून उपस्थित झाल्या शिवाय राहणार नाही. अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांनवर व दौंड तालुका विकास कामांवर भर देऊन अँड राहुल कुल यांनी उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले. पुढे बोलताना ते म्हणाले शुक्रवार हा यवत गावचा बाजार असतो मात्र शनिवारी देखील काष्टीचा बैल बाजार असतो. मागील निवडणुकीत २०१४ मध्ये दिलेल्या घोषणेची अंमलबजावणी करायची राहून गेली आहे. ती या निवडणुकीत पूर्ण केल्या शिवाय राहू नका. असा खोचक प्रश्न उपस्थित करून जुन्या आठवणींना अँड राहुल कुल यांनी उजाळा देऊन संदेश दिला आहे. खामगाव येथील काही युवा तरुण कार्यकर्त्यांच्या मनात नसताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बळजबरीने प्रवेश करून घेण्यात आला होता. यामध्ये कुमार मोडक. विजय मोडक. अमोल मोडक. नागेश वीर. शिवाजी गायकवाड. सुरेश नेटके. या सर्व कार्यकर्त्यांनी आज यवत येथे येऊन अँड राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला असल्याचे जेष्ठ नेते बाळासाहेब लाटकर यांनी बोलताना सांगितले. या प्रसंगी यवत गावचे विद्यमान उपसरपंच सुभाष यादव यांनी मनोगत व्यक्त केले. समारोपाच्या माध्यमातून ते बोलताना म्हणाले आज माननीय सुरेश भाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली यवत गावचे विद्यमान सरपंच समीर दोरगे ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील जेष्ठ नेते व पदाधिकारी मान्यवर या सर्वांच्या सहकार्याने. ५० ते ५५ कोटी रुपयांची यवत पंचक्रोशीत झालेल्या विकास कामांची दखल घेऊन श्री काळभैरवनाथांना साक्षी ठेवून सांगतो. राहुल दादांच्या विजयामध्ये यवत गावच्या मताचा सर्वात जास्त वाटा असेल असे आश्वासन यवत गावचे उपसरपंच सुभाष यादव यांनी दिले. या प्रसंगी यवत गावचे विद्यमान सरपंच समीर दोरगे उपसरपंच सुभाष यादव माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य नाथा आबा दोरगे. सदस्य गौरव दोरगे. इब्राहिम तांबोळी. राजेंद्र जगताप. समीर सय्यद. आदी यवत पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिक युवा तरुण नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविली होती.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद